
मराठी सिनेसष्टीतील नावाजलेला अभिनेता प्रसाद ओख कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. ७ जानेवारी १९९८ रोजी प्रसादने मंजिरी ओक बरोबर विवाह केला. आज या दोघांच्या लग्नाला २४ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या लग्नाला आता पंचविसाव वर्ष सुरू झालं आहे. अशात लग्नाच्या वाढदवसानिमित्त प्रसादने एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने अनेक चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी अभिनेता प्रसाद ओक याने पत्नीला दिल हे सुंदर गिफ्ट दिल आहे.

प्रसादने लग्नाच्या वाढदिवसनिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो त्याच्या पत्नीसह केक कट करत मंजिरीला भरवताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे की, “आज आमचं लग्न 25 व्या वर्षात पदार्पण करतंय. एवढ्या मोट्ठा प्रवासाचे अनेक चढउतार पाहिले. अनेक सुखाचे क्षण अनुभवले. अनेक माणसं, अनेक नाती जोडली… तुटली सुद्धा…या गाडीत अविरत राहिली. ती फक्त तुझी…तुझी साथ…आणि तुझं प्रेम…!!!” पुढे माझे शब्द संपले म्हणून एवढेच बोलतो असं म्हणत त्याने एक चारोळी लिहिली आहे. या चारोळीत त्याने लिहिलं आहे की, “ना अजून झालो मोठ्ठा ना स्वतंत्र अजुनी झालो तुजवाचून उमगत जाते तुजवाचून जन्मच अडतो…लव्ह यू मंजू लग्नाच्या वाढिवसाच्या शुभेच्छा. प्रसादच्या या रोमँटिक पोस्टवर अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजिचा वर्षाव केला आहे. तसेच दोघांनाही अनेक जन शुभेच्छा देत आहेत. प्रसादने या पोस्टसह या दोघांच्या पोस्ट वेडिंगचे दोन व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

हा व्हिडिओ ‘चल गाऊया गाणे’ या सुंदर गाण्यावर शूट करण्यात आला आहे. हा पोस्ट वेडिंगचा व्हिडिओ प्रसाद आणि मंजिरीने एकमेकांना लग्नाच्या वाढिवसानिमित्त दिलेलं सुंदर असं गिफ्ट आहे. व्हिडीओ शेअर करत प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हेच ते गिफ्ट. आता पर्यंत प्री वेडिंगचे बरेच व्हिडिओ आपण पाहिले. पण पोस्ट वेडींगचा आमच्या माहितीनुसार हा पहिलाच व्हिडिओ.” दर वर्षी एकमेकांना अनेक गिफ्ट देऊन यंदा काय द्यायचं असा विचार करत असताना काही माणसं भेटली आणि या दोघांनी हा व्हिडिओ एकमेकांना गिफ्ट म्हणून दिला आहे. सध्या या गाण्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आयुष्याच्या सुंदर क्षणी हे असं हटके काहीतरी करताना खूप मजा आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि पत्नी मंजिरी ओक याना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…