पराग कान्हेरेने केली माहिती उघड म्हणतो बिग बॉसमध्ये स्पर्धकांना हुशारीने खेळण्यासाठी आठवड्याला मिळते एवढे मोठे मानधन

मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन ह्यावेळी खूपच वादग्रस्त झालेला पाहायला मिळतो आहे. सतत आवाज उठवणाऱ्या आणि वाद निर्माण करणाऱ्या गायत्री, जय , मीरा आणि स्नेहा यांना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केलेले पाहायला मिळते मात्र ह्या स्पर्धकांना हुशारीने खेळण्यासाठीच बिग बॉसचे निर्माते भले मोठे मानधन देत आहे हे नुकतेच समोर आले आहे. बिग बॉसच्या घरात तुम्ही हुशारीने खेळलात तरच तुम्ही अखेरपर्यंत बाजी मारणार हे त्रिकाल सत्य असलं तरी प्रत्येक आठवड्यात या स्पर्धकांना त्यांचा खेळ खेळण्यासाठी भलीमोठी रक्कम मिळत असते. टास्क चांगला खेळणे किंवा प्रेक्षकांचे मनोरंजन होणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

त्यासाठी हे स्पर्धक तितक्याच ताकदीने बिग बॉसने दिलेले टास्क खेळत असतात. मात्र ह्यावेळी टास्क दरम्यान अनेकदा स्पर्धकांनी आक्रमक भूमिका दर्शवलेली आहे बिग बॉसच्या चावडीवर अशा स्पर्धकांची महेश मांजरेकर वेळोवेळी कानउघडणी देखील करताना दिसतात. बिग बॉसच्या सिजन २ चा स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतेच या मानधनाबाबत एक खुलासा केला आहे. ‘प्रत्येक स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी बिग बॉस दर आठवड्याला सुमारे लाख रुपये देते’ असे म्हणून त्याने बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनच्या स्पर्धकांवर नाराजी दर्शवत म्हटले की, ‘एवढे मानधन घेऊनही यास स्पर्धकांना त्याची किंमत नाही’… पराग कान्हेरेच्या म्हणण्यानुसार हा खेळण्यासाठी बिग बॉसचा प्रत्येक स्पर्धक आठवड्याला लाख रुपये कमावतो. परागच्या या खुलास्यावर एकाने अशी प्रतिक्रिया दिली होती की , ‘हे म्हणजे लोका सांगे ….झाले! तू तरी कुठे संयम ठेवलास?..तू संयम सोडलास आणि bb2 मध्ये जी काही थोडी मजा होती तुझ्यामुळे तिला मुकलो आम्ही!..जाऊदे.’ चाहत्यांच्या या प्रतिक्रियेवर स्वतः परागने खेद व्यक्त करत म्हटले की…’ अगदी खरंय… मी डीसअपॉइंट केलं माझ्या फॉलोअर्सना…आणि त्याची खंत नेहमी राहणार…’ पराग कान्हेरेने बिग बॉसच्या सिजन 2 मध्ये सहभाग दर्शवला होता मात्र एका टास्कदरम्यान त्याला त्रास होऊ लागला म्हणून त्याच्याकडून स्पर्धकांवर हात उचलला गेला आणि त्याला बॉसचे नियम मोडले म्हणून घरातून तडकाफडकी बाहेर काढले.

याची खंत मला नेहमी राहील असेच तो याबाबत म्हणाला. तिसऱ्या सिजनच्या स्पर्धकांना एवढे मानधन मिळते तरीही ते चांगले खेळत नाहीत असे पराग म्हणतो…बिगबॉस प्रोडक्शन टीम हा शो लोकप्रिय करण्यासाठी बरेच प्रयत्न करते. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे 16 तास काम करतात. हे contestants निकाल न देता TASK का वाया घालवत आहेत? सर्व मेहनत वाया जात आहे. सोनाली हुशारीने खेळत आहे. विशाल विनाकारण तिच्याशी उद्धट वागू लागला आहे. तो स्वतःच्या हितचिंतकांचे ऐकत नाही. सहानुभूती कार्ड प्रत्येक वेळी खेळल जात. Glamourgroup आक्रमकपणे खेळत आहे, पण विशाल, विकास, मीनल आणि सोनालीने नीतीमत्तेसह खेळ खेळावा. कारण ते महाराष्ट्राचे आवडते contestants आहेत. विशालला कालच task सहज जिंकता आले असते कारण तृप्ती ताई त्यांच्या बाजूने होत्या. ते योग्य नियोजन करून खेळू शकले असते. मीनल आणि सोनालीला विशालच्या बॅचेसचे संरक्षण करण्याची संधी मिळायला हवी होती. मला खात्री आहे की यामुळे चांगले results मिळाले असते. आणि विशाल captain झाला असता. (माझ्या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण तुमच्या सर्वांप्रमाणेच मी देखील प्रेक्षक म्हणून बिगबॉस मराठी पाहत आहे. ते पाहण्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ घालवतो. या मध्ये मी सेलिब्रिटी नाही. प्रत्येकाला माझ्या मतांचा आणि पोस्टचा विरोध करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि नेहमीच करिन.