प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आणि आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एन टी आर यांना बारा अपत्ये आहेत. उमा माहेश्वरी या त्यांच्या धाकट्या कन्या. हैद्राबाद जुबली हिल्स येथे त्या वास्तव्यास होत्या. सोमवारी बेडरूममध्ये त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आला आहे. एन टी आर हे तेलगू चित्रपट अभिनेते . तेलगू देशम पार्टीचे ते संस्थापक होते. काही काळ आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता.

उमा माहेश्वरी या त्यांच्या सर्वात धाकट्या कन्या होत. गेल्या काही वर्षांपासून त्या खूप आजारी होत्या. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असे बोलले जात आहे. सकाळी त्यांची धाकटी मुलगी आणि जवयाने बेडरूमचे दार उघडले तेव्हा उमा माहेश्वरी पंख्याला लटकलेल्या आढळल्या. चंद्रा बाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या उमा माहेश्वरी यांची बहीण आहेत. बहिणीच्या आत्महत्येची बातमी कळताच त्यांनी हैदराबाद जुबली हिल्स येथे उपस्थिती लावली होती. उमा माहेश्वरी यांनी डिप्रेशनमध्ये गेल्यानंतरच हे टोकाचे पाऊल उचलले असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पोलिसांनी सीआरपी १७४ कलमा अंतर्गत याची नोंद केली असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान उमा माहेश्वरी यांच्याजवळ कुठली चिठ्ठी देखील सापडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एन टी आर यांच्या त्या आत्या होत्या.