लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतून नितीश चव्हाण याने छोट्या पडद्यावर मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या अगोदर त्याने रंगभूमीवर काम केले आहे. नितीशला डान्सची देखील भयंकर आवड आहे Nextgen या नावाने नितीशची डान्स अकॅडमी आहे. मन झालं बाजींद फेम श्वेता खरात आणि नितीशचे डान्सचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. लागिरं झालं जी या मालिकेच्या सेटवर श्वेताने हजेरी लावली होती. त्यावेळी या दोघांचे एकत्रित असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते त्यावरून ती नितीशची गर्लफ्रेंड आहे अशी सर्वत्र चर्चा रंगली होती.

परंतु याबाबत दोघांनीही अजूनपर्यंततरी मौन बाळगलेले असले तरी श्वेताच्या वाढदिवसाच्या दिवशी नितीशने शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये या दोघांचे खूप वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण नाते आहे हे लक्षात येते. श्वेताला एका योध्याची उपमा देत नितीश तिचे कौतुक करताना म्हणतो की,
“श्वेता the fighter” तुझा आज वाढदिवस,खास दिवस,जन्मदिवस आज या निमित्ताने तुला सांगावस वाटतंय की तुला fighter यासाठी म्हंटलो कारण इतकी वर्ष मी तुला बघत आलोय,आपण एकत्र करिअर ची सुरुवात केली या प्रवासात किती चढ उतार आले,किती अवघड परिस्थिती आली पण त्यावर तू मात केलीस आणि आज तू जे काही आहेस ते फक्त आणि फक्त तू घेतल्याला मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. तुझ्या बरोबर राहून तुझ्याकडून खूप काही शिकलो. तुझ्यात ती positive energy आहे, तुझ्यात तो गोडवा आहे, तुझ्यात ती परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे. तू कधीच give up करत नाहीस. तू जिथे गेलीयेस तिथे तू तुझी छाप पाडलेली आहेस. तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. तू कायम खुष रहा, निरोगी रहा, आंनदी रहा आणि मुख्य म्हणजे कायम हसत रहा,कारण तू जिथे असतेस तिथंल वातावरण आपोआप हसत खेळत राहतं हे माहितेय मला

आणि अजून एक कारण हसत रहा कारण हसल्यावर तुझी डिंपल दिसते. स्वामींच्या आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती होत जातो, तुला उदंड आयुष्य देवो’ कौतुकाच्या या थापेसोबतच नितीशने श्वेतासोबत एकत्रित असलेले काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यावरून हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे समजते. मैत्रीच्या या प्रवासात दोघेही यशाचे एकेक टप्पे पार करत आहेत. श्वेताने देखील चित्रपट तसेच मालिकांमधून छोट्या मोठ्या पण तितक्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०० हल्ला हो या बॉलिवूड चित्रपटासोबतच श्वेताने राजा राणीची गं जोडी, मन झालं बाजींद मालिकेतून महत्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. श्वेता खरात हिला तिच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…