नितीश चव्हाण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. लागीरं झालं जी या मालिकेतील कलाकार डॉ ज्ञानेश माने यांचे १४ जानेवारी अपघातात निधन झाले होते. पण प्रेक्षकांनी मात्र नितीश चव्हाणचेच निधन झाले असल्याचा गैरसमज करून घेतला होता. त्यामुळे नितीशने आणि लागीर झालं जी या मालिकेतील कलाकारांनी ही अफवा असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ देखील केला होता आणि मी जिवंत आहे असे चाहत्यांना कळवले होते.

त्यानंतर तो जिवंत असल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांनी निश्वास टाकलेला पहायला मिळाला. मात्र नितीशने आज आणखी एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात तो “आम्ही पळून जाऊन लग्न केलंय…. आमच्या जीवाला धोकाय”…असे म्हणतो. यासोबतच नितीश असेही म्हणतो की, ” मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय,मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय…” असे तो सोशल मीडियावर तो व्यक्त होताना दिसत आहे. नितीशच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे तर अनेकांनी हा प्रमोशनचा भाग असल्याचे म्हटले आहे. नितीश असा का म्हणतोय याला एक खास कारण आहे. लवकरच नितीश चव्हाणचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “सोयरीक” या नावाने त्याचा प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

या चित्रपटात मानसी भवालकर ही अभिनेत्री त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मानसीने देखील अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी ही एक अनोखी युक्ती वापरली आहे जेणेकरून आपल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले जाईल. असे हटके प्रमोशन याअगोदर देखील मराठी चित्रपट तसेच नाटकांसाठी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नितीशच्या चाहत्यांना देखील त्याच्या आगामी चित्रपटाच्या हटके प्रमोशनचे कुतूहल वाटत आहे. मकरंद माने यांचा ‘सोयरीक’ हा आगामी चित्रपट अशा हटके प्रमोशनमुळे प्रेक्षकांचे लक्ष्य नक्कीच वेधून घेत आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटासाठी नितीश चव्हाण आणि मानसी भवालकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा..