निळू फुले यांचे निधन झाले त्यावेळी देखील त्यांचे…महेश टिळेकर यांनी मांडले लता मंगेशकर यांच्या स्मरकाबाबत विचार

फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. शिवाजी पार्क मैदानात रविवारी संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राजकीय मंडळींनी पुढाकार घेत लता मंगेशकर यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवजीपार्क मध्ये त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. राम कदम यांनी ही मागणी करताच त्यावर विविध स्तरातून विरोध दर्शविण्यात येऊ लागला. यासंदर्भात मीडियाने शिवजीपार्क परिसरात जाऊन तिथे फिरायला येणाऱ्या आणि व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या मागणीला थोडासा विरोध दर्शवला.

कारण शिवाजी पार्क असे ठिकाणी जिथे मुले खेळण्याचा आनंद घेतात इथे अगोदरच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यात आले आहे. मात्र आता आणखी स्मारक बनवायचे असेल तर पुरेशी जागा शिल्लक राहणार नाही. याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी देखील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात त्यांनी दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या बाबत देखील एक खुलासा केला आहे. महेश टिळेकर म्हणतात की, ‘नको स्मारक नको पुतळे संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान जगमान्य आहे. त्यांचा अजरामर स्वर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे आणि राहीलही . त्यांच्या नावे स्मारक बांधून कृतज्ञता दाखवण्या ऐवजी उत्तम आवाज असलेल्या गरजू गरीब नवोदित गायकांना गाण्याचं , संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्या महान गायिकेच्या नावाने संगीत विद्यालय निर्माण करून तिच्या नावे शिष्यवृत्ती दिली तर भविष्यात अनेक उत्तम गायकांचा सुरेल आवाज ऐकायला मिळेल. आपल्याकडे एखाद्या सन्माननीय दिग्गज व्यक्तींच्या स्मारका वरून राजकीय वादंग उठवले जाते.

संबंधित व्यक्तीच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी इतरही मार्ग असू शकतात. ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अफाट जनसमुदाय पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जमला होता.तेंव्हा तिथं उपस्थित एका मंत्री महोदयांनी सरकारच्या वतीने लवकरच निळुभाऊंचा पुतळा उभारला जाईल असं जाहीर केलं. त्याला निळुभाऊंच्या कुटुंबीयांनी नकार दिला आणि त्यांनी निळुभाऊंच्या नावे एखादं नाट्यगृह उभारावे असे सुचवले आणि काही वर्षात ते नाट्यगृह तयार झाले ज्याचा उपयोग नाट्यकर्मीना होतोय. ऐतिहासिक विर पुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी पण अनेकजण पुढाकार घेतात त्यावर लाखो रुपये खर्च होतात पण इतिहासाची साक्ष देणारे, ऐतिहासिक वैभव असलेले पण सध्या ढासळलेले गड किल्ल्यांची डागडुजी करताना मात्र उदासीनता दिसते .त्यावेळी नेतेमंडळी कुठं अदृश्य होतात? ….महेश टिळेकर