आजकाल सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालेलं आहे जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करू पाहत आहे. सध्या याच सोशल मीडियावर इंस्टाग्राम रिल व्हिडिओच ट्रेंड सुरू आहे आणि या मध्ये एक जोडपं चांगलच व्हायरल झालंय. आता पर्यंत तुम्ही अनेक डान्स जोक, फूड, संगीत याच्याशी निगडित व्हिडिओ पाहिले असतील. सासू आणि सून यांच्यातील झणझणीत भांडण नवरा बायको यांच्यातील प्रेम आणि मज्जा मस्ती देखील पाहिली असेल. अशात निखिल आणि हर्षदा वाघ ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत हास्य कल्लोळ पसरवला आहे.

निखिल आणि हर्षदाने आता पर्यंत सोशल मीडियावर १५० हुन अधिक नवरा बायकोच्या कॉमेडीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर यांचे लाखो फोलोवर्स आहेत. नवरा बायकोची भांडणे त्यांच्यात असलेलं प्रेम, राग, रुसवेफुगवे या सर्वांमध्ये एक वेगळीच मज्जा असते. नात्यातला हाच गोडवा हे दोघेही सर्वांबरोबर शेअर करत आहेत. निखिल आणि हर्षदा या दोघांनी २३ मे २०१९ रोजी आपली लग्नगाठ बांधली. निखिल हा एक व्हिडिओ क्रियेटर आहे. तसेच हर्षदा ही सध्या गृहिणी असून ती निखिलला व्हिडिओ क्रियेट करण्यासाठी मदत करते. तिने मुंबईच्या एस एन डी टी कॉलेज मधून अपल शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या या दोघांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही नवरा बायकोच्या व्हिडिओमधून रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. आजवर अनेकांनी नवरा बायकोच्या गोड भांडणांवर अनेक व्हिडिओ बनवले आहेत. मात्र त्यातील हर्षदा आणि नियखीलची जोडी साधी पण खळखळून हसवनारी आहे. या दोघांमध्ये होत असलेले वाद त्यांचे चाहते नेहमीच आवडीने पाहता. विशेष म्हणजे कोणतेही अपशब्द न वापरता आणि उगाचच कोणाला न दुखावता ते व्हिडिओ सादर करताना पाहायला मिळतात हि त्यांची नेहमीच जमेची बाजू मानली जाते. असो निखिल आणि हर्षदा ह्या जोडीला आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा…