येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत आता मोहित आणि स्वीटू ह्यांचं लग्न झालं आता स्वीटू मोहितच्या सांगण्यावरून काम शोधते तिला मोहितने सांगितलेल्या ठिकाणी नोकरी देखील मिळाली. मालिकेत मोहित हा पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असल्याचं दाखवलेलं पाहायला मिळतो. यापूर्वी देखील त्याने स्वीटू चा भाऊ चिन्या ह्याला ट्रेन मध्ये दाखवलेल्या घटनेमुळे चांगलाच ट्रोल झाला होता. त्यानंतर पुन्हा तो स्वीटूच्या घरच्यांना त्रास देताना पाहायला मिळाला. स्वीटू आणि ओम ह्यांच्या लग्नाच्या दिवशी मालविका स्वीटूच्या वडिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करताना दाखवलं शिवाय मोहीतला पैश्याच आमिष दाखवून स्वीटू सोबत त्याची लग्नगाठ देखील बांधली.

हे सगळं प्रेक्षकांना न पटण्यासारखंच घडलेलं दाखवलं. आता स्वीटू आणि मोहित दोघे ओम च्या घरीच राहायला आलेले पाहायला मिळतात. ह्यावर प्रेक्षकांनी नाराजी दाखवत मोहितला चांगलंच धारेवर धरलेले पाहायला मिळतेय. ह्यावर मोहित साकारणारा अभिनेता निखिल राऊत ह्याने ट्रोलिंगला कंटाळून एक भाष्य केलेलं पाह्यला मिळतंय त्यात तो म्हणतो ” निगेटिव्ह भूमिका साकारताना मला ट्रॉल केलं जाईल ह्याची मला कल्पना होती पण हे जरा जास्तच घडताना पाहायला मिळतंय. मी एक अभिनेता आहे आणि मला जे लिहून दिलाय तेच मला करावं लागत. माझ्याकडे जी भूमिका आलीय ते मी प्रामाणिकपणे करतो. अर्थात ते आवडणं किंवा न आवडणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. ट्रोलिंगला मी महत्व देत नाही पण वयक्तिक पातळीवर ट्रोलिंग करणं चुकीचं आहे. प्रेक्षकांनी मालिका पाहताना हे लक्षात ठेवावं कि हे सर्व काल्पनिक आहे वैयक्तिक जीवनात ह्याचा काही संबंध नसतो. मालिकेत उत्सुकता निर्माण करण्यासाठी मालिकेला वेगळं वळण दिल जात. प्रेक्षकांनी ट्रोल करताना व्यक्तिरेखेवर बोललेलं मी समजून घेऊ शकतो पण पर्सनल आयुष्यात ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे कृपा करून हे सगळं थांबवा.