मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. यात महत्वाचं म्हणजे सर्वांची लडकी जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी येत्या २ डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्याअगोदर मराठी सृष्टीतील आणखी एका कपलने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. ही कलाकार जोडी म्हणजेच नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी होय. ती परत आलीये या मालिकेतून नचिकेत आणि तन्वीने एकत्रित काम केले होते. या मालिकेचे कथानक आटोपशीर असल्याने काहीच दिवसांसाठी ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र या काही दिवसांच्या भेटीत मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. याच मालिकेतून नचिकेत आणी तन्वीमध्ये प्रेमाचे सूर जुळून आलेले दिसले.

काल मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी तन्वी आणि नाचिकेतचा मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. गेल्या दोन दिवसांपासून नचिकेत आणि तन्वीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली होती. मेहेंदी आणि हळदीच्या सोहळ्यानंतर काल त्यांचे लग्न पार पडले. यावेळी जवळच्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना त्यांनी आमंत्रित केले होते. जून महिन्यात तन्वी आणि नचिकेतचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर जवळपास पाच ते सहा महिन्यांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती परत आलीये ही एक हॉरर मालिका होती. मालिकेत अशी बरीचशी पात्र होती जी अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते. हे दोघेही कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करायचे. नाटकापासून आपल्या अभिनयाची सुरूवात केलेल्या तन्वीने विविधांगी भूमिकेत आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. यातूनच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत ती सगुणाबाईंच्या भूमिकेत दिसली होती. जुळता जुळता जुळतंय की या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका केली होती. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील तन्वीची भूमिकाही आव्हानात्मक होती.

अ ट्रायल बिफोर मान्सून या शॉर्टफिल्ममध्ये तन्वीने डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. सध्या उच्छाद या नाटकातून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. नचिकेतच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झाल्यास त्यालाही नाटकाची आवड आहे. सुखन या नाटयविषयक कार्यक्रमाशी तो जोडलेला आहे. महानिर्वाण या नाटकात नचिकेतची भूमिका खूप गाजली. नाटक, मालिका अशा माध्यमातून या दोघांनीही जम बसवण्यास सुरुवात केली आहे. तूर्तास नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या तन्वी आणि नचीकेतला मराठी सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचे मेसेजेस येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर अजूनतरी त्यांचे फोटो अपलोड केलेले पाहायला मिळत नाहीत पण त्याच्या लग्नाची वार्ता अनेकांना माहित असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी अभिनेता नचिकेत देवस्थळी आणि अभिनेत्री तन्वी कुलकर्णी याना आमच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा..