Breaking News
Home / जरा हटके / मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राजा साकारणाऱ्या अभिनेता यांच्यात आहे हे नातं

मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राजा साकारणाऱ्या अभिनेता यांच्यात आहे हे नातं

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता मिहीर आणि रामायणातील जनक राज्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच नेमकं कोणतं नातं आहे हे जाणून घायची उत्सुकता तुम्हाला लागली असेल पण त्यापूर्वी मिहीर कोण आहे जे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. अभिनेता मिहीर राजदा अमराठी असूनही मराठी सृष्टीत तो आपल्या अभिनयाने चांगलाच ओळखला जाऊ लागला आहे. गुजराथी थेटर आर्टिस्ट असलेल्या मिहिरने गुजराथी नाटक, हिंदी आणि मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कृष्णा या लोकप्रिय हिंदी मालिकेतील सुदामाची बालपणीची भूमिका मिहीरनेच साकारली होती.

mihir rajda in ramayan
mihir rajda in ramayan

कित्येक वर्षांनी कृष्ण म्हणजेच स्वप्नील जोशी आणि सुदामा म्हणजेच मिहीर राजदा यांची स्वप्नील जोशीच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेट घडून आली होती. हमारी देवरानी या हिंदी मालिकेत तो झळकला होता त्यानंतर तो मराठी सृष्टीकडे वळला. इथे त्याला माझ्या नवऱ्याची बायको या झी वाहिनीवरील मालिकेत आनंदची भूमिका मिळाली. मधल्या काळात त्याने स्क्रिप्ट रायटरची भूमिका देखील बजावली. सध्या तो सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत आहे. मिहीर राजदाचे कुटुंब देखील कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्याची पत्नी नीलम पांचाळ- राजदा ही गुजराथी, हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. काबिल, हेल्लारो या चित्रपटात ती झळकली आहे. निलमने देखील मराठी सृष्टीत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील ‘वैजू नं 1’ या मालिकेत मिहीर आणि नीलम दोघेही पती पत्नीच्याच भूमिकेत झळकले होते. रामायणातील जनक राजा म्हणून प्रसिद्ध असलेले “मूलराज राजदा” हे प्रसिद्ध अभिनेते, लेखक म्हणून ओळखले जात. हिंदी, गुजराथी भाषिक अनेक चित्रपट आणि नाटक त्यांनी साकारले होते. याशिवाय लोकप्रिय रामायण मालिकेत त्यांनी राजा जनक ची भूमिका साकारली होती. विक्रम वेताळ, महाभारत या मालिकेतून त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या पत्नी इंदुमती राजदा या देखील अभिनेत्री आहेत. खिचडी , साराभाई vs साराभाई, इन्स्टंट खिचडी , मन या मालिका आणि चित्रपटातून इंदुमती यांनी काम केले होते.

mohir with wife nilam and daughter
mohir with wife nilam and daughter

नुकतेच मिहिरची पत्नी निलमने सोशल मीडियाच्या माध्यमातून मूलराज राजदा यांना त्यांच्या ९ व्या पुण्यदिनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे आजोबा आणि सासरे’ असे कॅप्शन देऊन तिने ही माहिती शेअर केली आहे. मूलराज राजदा यांनी निभावलेले रामायणातील राजा जनक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहीले आहेत. त्यांनी त्याकाळी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. आजही त्यांनी केलेल्या त्या भूमिकांचं कौतुक अनेकजण करताना पाहायला मिळतात. अभिनेते मूलराज राजदा यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही आमच्या आणि तमाम भारत वासियांच्या सदैव स्मरणात राहाल ह्यात तिळमात्र शंका नाही.

actress nilam panchal post
actress nilam panchal post

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *