
महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम हा बॉलिवूड चित्रपट येत्या २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा एक प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला होता. अंतिम हा चित्रपट मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे दिसून येते. नुकतीच या चित्रपटासंदर्भात महेश मांजरेकर यांनी मीडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीवेळी मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनच्या बाबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्या मते यावेळी टॉप 5 मध्ये कोणते स्पर्धक असतील? ह्यावर उत्तर देताना महेश मांजरेकर म्हणाले…

महेश मांजरेकर ही यादी देत असताना म्हणाले की ,”माझे टॉप 5 आता तरी कारण पुढे जाऊन ते बदलतील की मला माहित नाही कारण ह्यावेळचा सिजन खूप कमाल आहे पण माझ्या मते विशाल, विकास, मीनल, जय आणि बहुतेक उत्कर्ष हे ५ सदस्य बिग बॉसच्या टॉप 5 पर्यंत बाजी मारू शकतील. उत्कर्ष तसा खूप हुशार आहे पण तो का त्या जयच्या शॅडोमध्ये खेळतो मला माहित नाही, तो त्याचं नुकसान करून घेतोय, त्यामुळे काय होतं की त्याला स्वतःचे डिसीजन्स घेता येत नाहीत.. मला कळत नाही की तो का असं वागतोय तो सगळ्यात हुशार आहे आणि त्याला मी टॉप 5 मध्ये बघतोय…पोरीपन खूप भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात तो विशाल तसा हुशार आहे तो डिपेंड होत नाही कोणावर तो आपापला गेम खेळतो पर्वा खूप चिडचिड झाली पण तो चुकीचा नाही खेळला.” अभिनेते महेश मांजरेकर यांनी ह्या 5 सदस्यांची संभाव्य टॉप 5 ची यादी प्रेक्षकांसमोर जरी मांडली असली तरी वास्तवात मात्र काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तूर्तास विशाल, विकास आणि मीनल या सदस्यांना महेश मांजरेकर टॉप 5 मध्ये पाहतात त्यामुळे या सदस्यांच्या चाहत्यांमध्ये याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे.

विशाल टॉप 5 मध्ये यावा आणि त्यानेच हा गेम जिंकावा अशी ईच्छा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. तर इकडे सोनालीचे चाहते देखील तिला प्रमुख दावेदार असल्याचं सांगताना पाहायला मिळतात. काल महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या चावडीवर घरातील सदस्यांचा समाचार घेतला पण कुठेही ओरडून न सांगता किंवा त्यांनी राग व्यक्त न करता सदस्यांची गमतीगमतीमध्ये कान उघडणी करताना दिसले. आज बिग बॉसच्या घरात निथा शेट्टी या अभिनेत्रीची वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री होत आहे तिच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडणार का हे ही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. हि अभिनेत्री मराठी नसली तरी तिचा चाहता वर्ग खूप मोठाआहे. तिने अनेक वेबसिरीज, चित्रपट आणि मालिकांत काम केला आहे. अनेक मराठी लोक देखील तिने केलेल्या कामाची स्थुती करताना पाहायला मिळतात. पण ती खेळ कसा खेळणार आणि बिगबॉसच्या घरात कशी वावरणार ह्यावर बरच काही अवलूंबून आहे.