Breaking News
Home / जरा हटके / बिग बॉस ४ ला मिळाला पहिला स्पर्धक शरद केळकर ललित प्रभाकर नव्हे तर हा अभिनेता तुम्ही ओळखलात का

बिग बॉस ४ ला मिळाला पहिला स्पर्धक शरद केळकर ललित प्रभाकर नव्हे तर हा अभिनेता तुम्ही ओळखलात का

कलर्स मराठी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित रियालिटी शो मराठी बिग बॉस सिजन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता या शोचा ग्रँड प्रीमिअर आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत ते जाहीर केले जाणार आहे. असे असले तरी काही सेलिब्रिटींवर मात्र शिक्कामोर्तब केलेला आढळून आला आहे. अर्थात ही नावे संभाव्य मानली जात असली तरी जवळच्या काही खास व्यक्तींकडून ही नावे उघड केलेली पाहायला मिळत आहेत. या वाहिनीवर सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिमन्यूने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे मालिकेचे नवे पर्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही भूमिका साकारणारा समीर परांजपे मराठी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची खात्रीदायक माहिती समोर येत आहे.

actor suvrat joshi in bigboss
actor suvrat joshi in bigboss

अशातच वाहिनीने एक चेहरा प्रसिद्ध केलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या शोला आपला पहिला स्पर्धक मिळाला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अभिनेता आणि जेंटलमन अशी खासियत असलेला हा अभिनेता कोण असेल यावर सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. वाहिनीने जो चेहरा प्रसिद्ध केला आहे तो चेहरा आणि शरद केळकर याच्या चेहऱ्यात बरेचसे साम्य तुम्हाला आढळेल. मात्र शरद केळकर मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावर येणे अशक्य आहे. बॉलिवूड सृष्टीतही शरद केळकरने आपली एक वेगळी इमेज तयार केली आहे. त्यामुळे राडा, भांडणं या गर्दीत तो गुंतून पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. या चेहऱ्यावर ललित प्रभाकरचे देखील नाव सुचवले जात आहे. मात्र ललित प्रभाकरचा चेहरा आणि प्रसिद्ध केलेल्या चेहऱ्यामध्ये कुठेच साम्य आढळून येत नाही. ही दोन्ही नावे प्रेक्षकांची शक्यता वाढवत आहेत मात्र या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेला हा अभिनेता अनेकांनी ओळखला आहे. हा चेहरा अभिनेता सुव्रत जोशीच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा आहे. सुव्रत जोशी अनन्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता . सध्या त्याच्याकडे कुठलाच नवीन प्रोजेक्ट नसल्याचे बोलले जात आहे आणि याच कारणामुळे तो बिग बॉसच्या घरात जाण्यास उत्सुक असेल.

big boss actor suvrat joshi
big boss actor suvrat joshi

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून सुव्रतला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. स्कॉलर म्हणूनही त्याला मालिकेत ओळख दिली होती. अमर फोटो स्टुडिओ, आठशे खिडक्या नऊशे दारं, मन फकिरा, शिकारी, डोक्याला शॉट, गोष्ट एका पैठणीची अशा चित्रपट, मालिका आणि नाटकातून त्याने त्याच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. बिग बॉचया चौथ्या सिजनचा पहिला वाहिला कंटेस्टंट एका हिंटमधून प्रेक्षकांच्या समोर आल्याने सुव्रत बिग बॉसच्या घरात स्वतःला कसा सिद्ध करणार याची अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच्या असण्याने या शोला चांगलाच रंग चढेल अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महेश मांजरेकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी बिग बॉस साठी बांधील नाही असं म्हटलं होत त्यानंतर बिगबॉस मधून ते पुन्हा होस्ट करताना पाहायला मिळणार नाही असच वाटत होत पण आला बिगबॉस सुरु होतानाची चित्रे दिसताना तेच पुन्हा होस्ट करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.