
सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहवरील मालिकेवर आजवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवली आहे त्याचमुळे मधल्या काळात या मालिकेचा टीआरपी देखील वाढला होता. जयदीप आणि गौरी ची प्रेमकहाणी आजवर प्रेक्षकांनी स्वीकारली आहे मात्र नुकतेच या मालिकेबाबत अनेकांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळतो आहे. त्याबद्दल महेश कोठारे आणि मालिकेच्या टीमने जाहीर माफी मागावी अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत अधिक माहिती अशी की, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी सोशल मीडियावरून नुकतीच जाहीरपणे माफी मागितली आहे.

याचे कारणही तसेच आहे. मालिकेचा १४ सप्टेंबर चा भाग आक्षेपार्ह असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले हिते त्या भागात मालिकेतील सँडी विश्वास हे पात्र वंदणीय गौतम बुद्धाचा फोटो असलेला ब्लाउज घातला होता. या फोटोमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते तर अनेकांनी या मालिकेविरोधात टीका देखील केलेल्या पाहायला मिळाल्या. गौतम बुद्ध आम्हाला आदरणीय आहेत त्यांची अशा पद्धतीने विटंबना होते असा आक्षेप व्यक्त झाला होता. या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्याची दखल महेश कोठारे यांनी घेतलेली पाहायला मिळत आहे. १४ सप्टेंबर रोजीच्या भागात आमच्याकडून जी चुक घडली त्याबद्दल मी व मालिकेची संपूर्ण टीम तसेच मालिकरत काम करणारे सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ तुमची जाहीरपणे माफी मागतो यापुढे आमच्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही असे मी तुम्हाला आश्वस्त करतो असे महेश कोठारे यांचे म्हणणे होते. वंदनीय गौतम बुद्ध हे आम्हाला कायमच आदरणीय आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता…. जाणूनबुजून आम्ही कोणीही ही चूक केलेली नाही… तुम्हा सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि तुम्ही सुद्धा मला माफ कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. महेश कोठारे यांच्या माफीनाम्यानंतर चाहत्यांनी देखील त्यांच्या या माफीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.