Breaking News
Home / जरा हटके / कुशल बद्रिकेवर आली माणसं पारखून घेण्याची वेळ पहा कुशल का म्हणतोय असं?

कुशल बद्रिकेवर आली माणसं पारखून घेण्याची वेळ पहा कुशल का म्हणतोय असं?

अभिनेता कुशल बद्रिकेच्या सोशलमीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. त्याने शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडिओइतकीच त्याने लिहिलेली कॅप्शन बोलकी असते. नुकतीच कुशलने एक फोटो पोस्ट केलाय. आता मी माणसं पारखून घेणार असं म्हणत त्याने व्यक्त केलेल्या भावनेचा अर्थ लावण्यात चाहते दंग झाले आहेत. विनोदाच्या मंचावर हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या अभिनेता कुशल बद्रिकेच्या सोशलमीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. कुशल कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीसाठी जिथे जातो तिथला एक तरी असा फोटो तो शेअर करतो ज्यामुळे सोशलमीडियावर कुशलची हवा असते. कुशलचा फोटो, त्याचे व्हिडिओ तर व्हायरल होत असतातच पण त्याच्या पोस्टची खासियत असते ती म्हणजे त्याने लिहिलेली कॅप्शन.

kushal badrike actor
kushal badrike actor

नुकताच कुशलने एक फोटो शेअर केला आहे. यावेळीही त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. चला हवा येऊ द्या या शोमुळे कुशलच्या विनोदाचे चाहते वाढले. कुशल घराघरात पोहोचला. कुशल जरी विनोदी अभिनेता असला तरी त्याला समाजातील दुखऱ्या गोष्टी कशा मांडायच्या याची अफलातून जाण आहे. आता हेच बघा ना, त्याने एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये त्याने एक नवा चष्मा खरेदी केला आहे. आता तुम्ही म्हणाल हा तर साधा चष्मा आहे. पण कुशलच्या शब्दांमधून समाजातील एका प्रवृत्तीवर त्यानं भाष्य केलं आहे. असं म्हणतात की डोळे असणं आणि दृष्टी असणं यामध्ये खूप फरक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सगळं चुकीचं दिसतं तेव्हा डोळ्यावरचा चष्मा काढ असं उपरोधानं म्हटलं जातं. हाच धागा पकडून अभिनेता कुशल बद्रिके याने समाजातील एका प्रवृत्तीवर ताशेरे ओढले आहेत. कुशलच्या या कोपरखळीचं चाहते भरूभरून कौतुक करताना दिसत आहेत. कुशलने काळ्या रंगाच्या फ्रेमचा चष्मा फोटोमध्ये घातला आहे. सोबत लिहिलेल्या ओळीत कुशल असं म्हणतोय की, यंदा वेगळया दृष्टीकोनाचा चष्मा घेतलाय. आता माणसं पारखून घेईन म्हणतोय.

comedy marathi actor kushal
comedy marathi actor kushal

कुशल च्या या बोलण्यात खूप अर्थ आहे. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी मतंही दिली आहेत. खरच, आजच्या जगात माणसांचा भरवसा नाही असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे तर काही यूजर्सनी चष्मा आणि माणसांची पारख हे जोडणाऱ्या फोटोला लाइकचा पाऊस पाडला आहे. एकदा कुशलने चला हवा येउद्या च्या मंचावर मला माणसं ओळखता येत नाहीत ते माझा गैर फायदा घेतात असं देखील म्हणाला होता. सध्या कुशलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. चला हवा येऊ द्या या शोबरोबरच कुशल पांडू या सिनेमात दिसला होता. तर स्ट्रगलर साला या वेबसीरीजमध्येही कुशलच्या अभिनयाचं कौतुक झालं. दिग्दर्शक विजू माने यांच्याजोडीने कुशल काही ना काही व्हिडिओ बनवत असतो. तर कुशलच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही तो सोशलमीडियावर शेअर करत असतो. असो ह्या फसव्या जगात पुढे तो माणसं पारखून त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिकेल अशीच अपेक्षा करूयात.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *