Breaking News
Home / जरा हटके / हेमंत ढोमेला आजही का आठवतो गणिताचा तास म्हणतो बाई वर्गात आल्या कि मी एकटक त्यांच्याकडे पाहत राहायचो

हेमंत ढोमेला आजही का आठवतो गणिताचा तास म्हणतो बाई वर्गात आल्या कि मी एकटक त्यांच्याकडे पाहत राहायचो

आयुष्यातलं पहिलं क्रश हे बहुतेकवेळा शाळेतले सर किंवा बाईच असतात हे एव्हाना सेलिब्रिटी कलाकारांनी कबूल केलेल्या पहिल्या प्रेमावरून सिद्धच झालं आहे. कोणत्याही कलाकाराला विचारा की ते आयुष्यात पहिल्यांदा कुणावर लटटू झाले तर त्याचं उत्तर देताना ही मंडळी शाळेतल्या वर्गात पोहोचतात. मुलं असतील तर त्यांना शाळेत शिकवणाऱ्या बाई खूप आवडलेल्या असतात आणि मुलींचा जीव त्यांच्या सरांवर आलेला असतो. सेलिब्रिटी झाल्यावर मुलाखतीमध्ये पहिल्या प्रेमाविषयी बोलताना त्या प्रेमळ आठवणींची खपली निघतेच. अभिनेता हेमंत ढोमे यालाही त्याच्या शाळेतल्या गणिताच्या बाई खूप आवडायच्या. हेमंतचे गणितशी कधी जमले नाही पण गणिताच्या बाईंकडे तो टक लावून पहात बसायचा.

actor hemant dhome
actor hemant dhome

हे त्या बाईंना इतकं खटकलं की गणिताच्या तासाला बाई वर्गात आल्या की त्या आधी हेमंतकडे बघायच्या .. त्याला, ढोमे बाहेर जा असं सांगायच्या आणि मगच गणित शिकवायला सुरुवात करायच्या. हेमंत याच संदर्भातला एक किस्सा सांगताना म्हणाला की त्यावेळी मी आठवीत होतो आणि मला आमच्या गणिताच्या बाई खूपच आवडायच्या. मला असं वाटायचं की मला या बाईंमुळेच गणित आवडू लागेल की काय ! पण बाईंनी ती संधीच दिली नाही. त्यांच्याही हे लक्षात आले की त्या वर्गात आल्या की मी त्यांच्याकडे एक टक लावून पाहत असतो. त्यांनी जे काय ओळखायचे ते ओळखलं आणि त्या वर्गात आल्या की पहिल्यांदा मला बाहेर काढायच्या आणि मग त्या गणिताचा तास घ्यायच्या. त्यामुळे झालं काय की, आठवीचं अख्खं वर्ष मी गणिताच्या तासाला वर्गाबाहेर जाऊनच काढलं. का कुणास ठाऊक मीही कधी एकदाही असं म्हणालो नाही की मी वर्गाबाहेर नाही जाणार. त्या बाहेर जा म्हटल्या की मी बाहेर जायचो. त्यांचं ते बाहेर जा म्हणणं हे देखील मला खूप आवडायचं. गणिताचा तास संपला की मग मी वर्गात यायचो आणि कुठल्याही मित्राकडून तासाला काय काय झाले ते समजून घ्यायचो.

hemant and kshiti jog
hemant and kshiti jog

त्यामुळे ना धड माझं गणित सुधारलं ना मी माझ्या आवडत्या बाईंचे मन जिंकू शकलो. आजही मला त्या बाई आठवतात. त्यांच्या मी किती लक्षात आहे हे मला नाही माहित कारण मी कधी गणिताच्या तासाला बसलोच नाही. शाळेची आठवण निघाली की मला शाळेतल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझा आठवीतला गणिताचा तास आणि त्या गणिताच्या बाई या दोनच गोष्टी सगळ्यात आधी आठवतात. पण हे सगळं फक्त आवडतं म्हणून असत त्यांचा आदर आपण नेहमीच करतो ते फक्त एक कोवळं मन असत. नाटक, सिनेमा या दोन्ही माध्यमांमध्ये सक्रिय असलेल्या हेमंतने दिग्दर्शित केलेल्या झिम्मा या सिनेमाने गेल्याच महिन्यात दणक्यात यश मिळवले. अभिनेत्री क्षिती जोगसोबत त्याने लग्न केलं आहे. हेमंतचा प्रांत हा खरेतर लेखनाचा आहे. त्याचे नाट्यलेखन, संवादलेखन गाजले आहे. तो शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून लेखन करतो. इंडस्ट्रीत तो त्याच्या मिश्कील स्वभावासाठी ओळखला जातो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *