अभिनेता हार्दिकनं आपल्या होणाऱ्या पत्नीला अक्षयाला वाढदिवसाचं दिलं सरप्राइज तिला काय म्हणाला पहा

तुझ्यात जीव रंगला असं फक्त मालिकेतच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांना म्हणत राणा आणि पाठकबाई फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी प्रेमात पडली. आता प्रेमात पडलेल्या जोड्याना एकमेकांना सरप्राइज द्यायला खूप आवडत असतं. मग आपला राणा म्हणजेच हार्दिक मागे कसा राहिल बरं. अक्षयाचा आज वाढदिवस असल्याने हार्दिकने तिच्यासाठी खास सरप्राइज प्लान केलं. अक्षयाचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी चालतय की अशी खास कमेंट केली आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या निमित्ताने हार्दिक आणि अक्षया हे साडेचार वर्षे एकत्र होते, मात्र तेव्हा त्यांच्यात फक्त मैत्रीच होती.

अक्षया तेव्हा अभिनेता सुयश टिळकसोबत रिलेशनशीपमध्ये होती. गेल्या वर्षी अक्षयाचे सुयशसोबत ब्रेक झाले. पण तरीही अक्षया आणि हार्दिक यांच्यातील खास रिलेशनची कोणतीच कल्पना चाहत्यांना त्यांनी लागू दिली नाही. अचानक साखरपुडा करून या जोडीने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने खास तयारी केली. तिच्यासाठी डेकोरेशन केले. दोन केक आणले. हे सगळे फोटो हार्दिक आणि अक्षयाने त्यांच्या इन्स्टापेजवर शेअर केले आहेत. या फोटोसोबत हार्दिकने व्यक्त केलेल्या काही ओळींनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हार्दिकने अक्षयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असं लिहिलं आहे की, माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व मौल्यवान व्यक्तील वाढदिवसाच्या शुभेच्छा. ही जोडी लवकरच लग्न करणार आहे. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. अधिकृत नातं जाहीर केल्यानंतर अक्षयाचा पहिला वाढदिवस हार्दिकने उत्साहात व प्रेमाने साजरा केल्याने अक्षयाही खुश आहे. हार्दिक सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थ देशमुख ही भूमिका साकारत आहे. तसेच त्याने कोल्हापूरमध्ये थंडाईचा व्यवसाय सुरू केला आहे. अक्षयाने हे तर कायच नाय या शोचे सूत्रसंचालन केले होते. सध्या ती काही जाहिरातींसाठी मॉडेलिंग करत आहे.