Breaking News
Home / जरा हटके / बहिणीच्या घरी हार्दिकचं पहिलं केळवण लग्नगाठ बांधताच बिग बॉसच्या घरात होणार दाखल

बहिणीच्या घरी हार्दिकचं पहिलं केळवण लग्नगाठ बांधताच बिग बॉसच्या घरात होणार दाखल

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये दाखल होण्यासाठी अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. हरीश दुधाडे, मानसी नाईक , समीर परांजपे, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी ही नावे समोर आली असली तरी मानसी नाईक या सिजनमध्ये सहभागी होत नसल्याचे तिने सांगितले आहे. या नावांमध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या लाही दिवसातच स्पष्ट होणार आहे. मात्र हार्दिक जोशी या शोमध्ये सहभागी होत असण्याची दात शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दीकने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. अक्षया आणि तू बिग बॉसच्या घरात जाणार का? या प्रश्नावर त्याने उघडपणे बोलणे टाळले होते मात्र आपल्या बोलण्यातून त्याने एक हिंट देखील दिलेली पाहायला मिळाली होती.

actor hardeek joshi mom and dad
actor hardeek joshi mom and dad

बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत हार्दिक म्हणाला होता की, मी बिग बॉसच्या घरात जाईल किंवा नाही हे तुम्हाला येत्या काही दिवसातच कळेल. मात्र प्रेक्षकांची उत्कंठा मी तशीच राखून ठेवणार आहे. मला हा सस्पेन्स कायम राखून ठेवायचा असल्याने मी आताच यावर स्पष्ट बोलणार नाही. मात्र तुम्हाला माहीतच आहे की मी आणि अक्षया गेल्या काही दिवसांपासून आमच्या मित्रांच्या घरी केळवण करत आहोत. त्यामुळे आम्ही लवकरच विवाहबद्ध होणार हे सर्वश्रुत झाले आहे.’ हार्दीकच्या या सस्पेन्स वाढवण्यामुळे तो बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आणि म्हणूनच त्यांची लगीनघाई देखील जोरदार सुरू झालेली पाहायला मिळत आहे. हार्दीकने लग्नाची तारीख जाहीर केलेली नसली तरी येत्या काही दिवसातच हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हार्दीकने कुडाळला जाऊन त्याच्या बहिणीची भेट घेतली. बहिणीच्या कुटुंबीयांनी हार्दीकचे स्वागत करत त्याचे केळवण साजरे केले आहे. ‘हार्दीकचे केळवण’ असे कॅप्शन देऊन त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हार्दिक आणि अक्षयाचे लग्न व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची मनापासून ईच्छा होती.

hardeek joshi wedding kelvan
hardeek joshi wedding kelvan

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत असताना या दोघांचे सूर जुळून आले होते. दोघांचे जुळलेले बॉंडिंग पाहून त्यांनी लग्न करावे असा सल्ला त्यांच्या चाहत्यांकडून मिळत होता. अनेकदा या दोघांना हार्दिक जोशींच्या स्टॉल वर एकत्रित असल्याचे फोटो देखील व्हायरल होत होते आणि अचानक झालेल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना हा सुखद धक्काच दिला होता. आता लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच हार्दिक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याअगोदर या दोघांच्या लग्नसोहळ्याचा थाट कसा असणार आहे याची अधिक उत्सुकता आहे. लग्न गाठ बांधताच तो खर्च बिगबॉसच्या घरात जाणार का असा सवाल अनेकांना पडला असेल पण ह्याचे उत्तर देखील तुम्हाला काही दिवसात स्पष्ठ होताना दिसून येईल.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.