गश्मीर महाजनीने मालिका सोडल्याचे सांगितले कारण…गश्मीर पाठोपाठ ही मराठी अभिनेत्री देखील घेणार एक्झिट?

स्टार प्लस वाहिनीवर ‘इमली’ ही हिंदी मालिका प्रसारित केली जात आहे. टीआरपीच्या बाबतीत या मालिकेने कायम पहिल्या पाचच्या यादीत आपले नाव नोंदवले होते अशातच मालिकेचा मुख्य नायक आदित्यच्या भूमिकेत झळकणारा गश्मीर महाजनी याने ही मालिका सोडली असल्याने चाहत्यांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. गश्मीर महाजनी याने आजवर मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत इमली या मालिकेतून तो हिंदी सृष्टीत लोकप्रियता मिळवताना दिसला. गश्मीरने मालिका का सोडली यावर अनेक चर्चा मीडिया माध्यमात रंगवल्या गेल्या.

गश्मीर सेटवर वेळेवर पोहोचत नव्हता किंवा निर्मात्यासोबत त्याचा वाद झाला असावा म्हणून त्याने मालिका सोडली अशा बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. खरं तर इमली ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये असताना नायकाने मालिका सोडणे हे त्याच्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते मात्र ही मालिका मी का सोडली याचे कारण त्याने नुकतेच एका मुलाखतीतून दिले आहे. ‘लास्ट डे ऑफ शूट’ असे कॅप्शन देऊन गश्मीरने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता त्यावरून तो ही मालिका सोडणार हे निश्चित झाले होते. मात्र मी ही मालिका का सोडली याचे एक वैयक्तिक कारण असल्याचे तो मीडियाशी बोलताना म्हणाला. गश्मीरने मालिका सोडण्याचा निर्णय खूप अगोदरच घेतला होता मालिकेची निर्माती गुल खानला त्याने हे अगोदरच कळवले होते. मात्र गश्मीर मालिकेचा महत्वाचा चेहरा असल्याने गुल खानने त्याला मालिका न सोडण्यासाठी समजावले होते. मात्र दुसऱ्या एका प्रोजेक्टमुळे वेळ मिळत नसल्याने गश्मीरने अखेर हा कठोर निर्णय घेत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आमच्यात कुठलेही वाद झालेले नाहीत असे म्हणत त्याने यानंतरही गुल खान सोबत आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास इच्छूक असेल असे गश्मीरने स्पष्टीकरण दिले आहे.

गश्मीर महाजनी हा मालिकेचा महत्वाचा चेहरा होता त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी तो मालिका सोडणार असल्याचे निश्चित झाल्यावर त्याच्यासारख्या दमदार कलाकाराची शोधाशोध सुरू केली होती. गश्मीर महाजनी मालिका सोडणार म्हणून मालिकेत ट्विस्ट आणला आहे. एका धमक्याने आदित्यचा मृत्यू होत असल्याचे मालिकेत दाखवले जात आहे. मात्र तो नवा चेहरा घेऊन मालिकेत नव्याने एन्ट्री करणार आहे. या दुर्घटनेत आदित्यचा मृत्यू होणार हे समजून मालिनी देखील त्रिपाठी हाऊस सोडून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मालिनीची भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुखने साकारली आहे त्यामुळे मालिकेत गश्मीर पाठोपाठ मयुरीची देखील एक्झिट होणार का अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे. मालिकेतून ही मुख्य पात्र एक्झिट घेत असतील तर मालिकेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलेल असेही या मालिकेच्या चाहत्यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसातच याबाबत अधिक स्पष्टीकरण मिळेल.