जरा हटके

अभिनेता भारत जाधवने आई वडिलांच्या आठवणीत काय केलं पहा

ऑल द बेस्ट या नाटकाच्या भरघोस यशानंतर अभिनेता भरत जाधवने जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकट फु, सही रे सही यासारख्या अनेक कलाकृतीतुन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले . मराठी सृष्टीतील सुपरस्टार अशी ओळख मिळवणाऱ्या भरत जाधवने कलाकारांना मानधन वाढवून मिळवण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. मधल्या काळात एकापाठोपाठ एक असे दमदार चित्रपट आणून मराठी सृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार ठरला होता.

actor bharat mother and father
actor bharat mother and father

एवढेच नव्हे तर मराठी सृष्टीत पहिल्यांदा व्हॅनिटी व्हॅन घेणारा पहिला कलाकार म्हणून भरत जाधव यानी आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला होता. दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मेकअप करून या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन झाले होते. यशाच्या एकएक पायऱ्या चढत असताना आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी होता. कोल्हापूरला गावी गेल्यावर घर नसल्याने भरत जाधव नातेवाईकांकडे राहायचे. यातूनच कोल्हापुरात एक बंगला घ्यायचा त्यांनी ठरवले. आई वाडीलांना सरप्राईज देत त्यांना विमानात बसवून ते नव्या बंगल्यात दाखल झाले होते. वडील टॅक्सी ड्रायव्हर त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती नाजूकच होती. एक दिवस ऑल द बेस्ट या नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी त्यांच्या टॉक्सित काही लोकं बसली होती. उशीर होत असल्याने त्या लोकांनी भरत जाधव यांच्या वडिलांशी हुज्जत घातली होती, आई बहिणीवरून घालून पडून बोलत होते मात्र केवळ आपल्या मुलाचे नाटक पाहण्यासाठी हे लोकं जाणार आहेत ह्या विचाराने ते गप्प बसले होते. हा किस्सा त्यांनी घरी आल्यावर सांगितला त्यावेळी बाप लेकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

actor bharat with mahesh tilekar
actor bharat with mahesh tilekar

त्यावेळी भरत जाधव यांना नाटकाचे १०० रुपये मिळायचे. आता पुरेसे पैसे मिळताहेत यापुढे तुम्ही टॅक्सी चालवायची नाही असे म्हणून भरत जाधवने आपल्या वडिलांना समजावले होते परंतु आपल्या मुलाचे नाटक चालेल की नाही हा विचार करून त्यांच्या वडिलांनी आपली टॅक्सी विकली नव्हती. पहिल्यांदा मराठी सृष्टीत महागडी गाडी घेण्याचा मान देखील भरत जाधव यांनीच मिळवला होता. कार खरेदी केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या हातात स्टेअरिंग दिले होते. आनंदाचे हे क्षण अनुभवत असताना भरत जाधव यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आई वडिलांच्या आठवणीत त्यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या शेतात आई वडिलांचे स्मारक उभारले आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी भरत जाधव यांच्या आई वडिलांचे स्मारक असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘पुत्र असावा तर असा’…असे म्हणत सुपरस्टार भरत जाधव यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button