Breaking News
Home / जरा हटके / मुंबईत येऊन हिरो बनण्यासाठी त्यावेळी भारत गणेशपुरे यांनी मारली होती थाप

मुंबईत येऊन हिरो बनण्यासाठी त्यावेळी भारत गणेशपुरे यांनी मारली होती थाप

चंदेरी दुनियेची ओढ सर्वानाच असते. गावी येऊन मुंबईत स्ट्रगल करणे आणि काम मिळवणे हे प्रसंग बहुतेकांच्या आयुष्यात आले आहेत. असाच स्ट्रगल करून मराठी सृष्टीत स्थिरस्थावर होऊन चला हवा येऊ द्याचा मंच गाजवणाऱ्या भारत गणेशपुरे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. भारत गणेशपुरे मराठी सृष्टीत आपल्या विदर्भीय शैलीमुळे जास्त ओळखले जातात. मूळचे अमरावतीचे असलेल्या भारत गणेशपुरे यांचे वडील शिक्षण अधिकारी होते. त्यमुळे अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. अमरावतीला शिकत असताना नाट्यधर्मी या संस्थेशी ते जोडले गेले. नववीत असल्यापासूनच ते नाटकातून काम करत असत.

bharat ganeshpure wedding
bharat ganeshpure wedding

वाईट मित्रसंगतीमुळे अभ्यासात हुशार नसल्याने त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाले . पुढे त्यांनी बीएस्सी ऍग्रीकल्चरल केलं. नाटकातून , नाट्यस्पर्धांमधून भाग घेत असल्याने त्यांना अभिनय क्षेत्राची ओढ जास्त होती. पुढे जाऊन त्यांचं हिरो बनायचं स्वप्न होतं. त्यासाठी मुंबईला जायला लागणार हे त्यांनी मनाशी पक्कं केलं होतं. मात्र मुंबईला जाण्यासाठी घरी सांगणार काय? कारण नातेवाईकांची रीघ फक्त जळगाव पर्यंतच त्यामुळे त्यांचा एकही नातेवाईक मुंबईला नव्हता. शेवटी एक युक्ती लढवून त्यांनी एमपीएससीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि त्यात मुद्दामहून मुंबईचे सेंटर टाकले. आपला मुलगा चांगला अभ्यास करतो या हेतूने त्यांच्या वडिलांनी भारत गणेशपुरे यांना मुंबईला जाण्यास परवानगी दिली. आता मुंबईहून परत अमरावतीला जायचं नाही हा निर्णय त्यांनी मनाशी पक्का केला. नाट्यधर्मी संस्थेशी निगडित असलेले त्यांचे काही मित्र मुंबईत राहत होते . त्यांच्या रूममध्ये काही दिवस काढले. पुढे आमदार संजय बंड यांच्या आमदार निवासमध्ये काही दिवस काढले. घरच्यांना काळजी वाटू नये म्हणून टेलिफोन बुथवरून घराजवळ असलेल्या लोकांकडे मी नाटकात काम करतोय एवढा निरोप ते त्यांना द्यायचे. खरं तर नाटकात असे कुठलेही काम मिळाले नसतानाही केवळ घरच्यांनी काळजी करू नये म्हणून त्यांना असे खोटं बोलावे लागायचे.

bharat ganeshpure family
bharat ganeshpure family

पुढे पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले मग आर्ट डिरेक्टरच्या हाताखाली काम केले. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी धडपडत होते त्यावेळी दुरर्दशनवर फरार नावाची मालिका होती या मालिकेमध्ये एका पार्टीत असलेल्या घोळक्यात भारत गणेशपुरे यांना उभं राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी पुष्कर क्षोत्रीचा मोबाईल खाली पडला आणि अचानक भारत गणेशपुरे यांनी बेवड्याच्या भूमिकेत येऊन तो खाली पडलेला मोबाईल आपल्या अंदाजात त्याला दिला. भारत गणेशपुरे यांनी अचानक असे ऍडिशन घेतल्यामुळे दिग्दर्शक आणि उपस्थित सर्वच जण हसायला लागले आणि हा कोण ? असे म्हणून भारत गणेशपुरेचा तो सिन पुन्हा शूट करायला लावला. भारत गणेशपुरे यांचे हे ऍडिशन दिग्दर्शकाला आवडले आणि यामुळे पुढच्या दोन तीन भागासाठी भारत गणेशपुरे यांना प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आले. आणि इथून पुढे अभिनय क्षेत्रातला त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला. फु बाई फु, व्हीआयपी गाढव, शिकारी, चला हवा येऊ द्या , वाघेऱ्या अशा चित्रपट, मालिका आणि रिऍलिटी शो मधला त्यांच्या अचाट विनोदी अभिनयाच्या यशाचा हा आलेख चढताच राहिला.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *