नुकताच अविष्कार दारव्हेकर बिगबॉसच्या घरातून बाहेर पडला. घरात असताना तो अतिशय शांत स्वभावाचा दिसला आक्रमक खेळ देखील तो संथ गतीने खेळताना पाहायला मिळाला. बिगबॉसच्या घरात येण्याआधी त्याच वजन तब्बल १३० किलो होत. बिग बॉसचे खेळ खेळण्याकरता त्याने योग्य व्यायाम आणि डायट करून आपलं २० किलो वजन कमी केलं होत. आता बिग बॉसच्या खेळातून बाहेर पडल्यामुळे तो अजून वजन कमी करून फिट राहून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करणार असल्याचं अविष्कार म्हणतो.

गेल्या काही वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रापासून दूर होता त्यातच हा महामारीचा काळ आला आणि त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष झालं त्यामुळेच माझं वजन तब्बल १३० किलो पर्यंत वाढलं असल्याचं त्याने सांगितलं. पण ह्याच काळात त्याने एक अनोखा उपक्रम देखील राबवला. त्याने दादर येथे स्वतःचे पाटीलज किचन नावाने फूड कॉर्नर सुरू केले आहे. त्यामुळे आवडीने खाणे आणि खायला घालणे त्याच्या आवडीचे काम होते त्यातून गरीब आणि गरजू लोकांना पोटभर अन्न पुरवण्याचे मोलाचे काम केले. त्यामुळे स्वतःकडे तो लक्ष देऊ शकला नाही. कुठल्याही दुकानात त्याला त्याच्या साईजची पॅन्ट मिळत नसे त्यावेळी मोठा अपमान झाल्यासारखे वाटत असे म्हणूनच अगदी बिग बॉसच्या घरात देखील तो नित्यनेमाने व्यायाम करताना दिसत. आता त्याला फिटनेसच महत्व समजलं असून आता पुढेदेखील तो व्यायाम चालूच ठेवणार असल्याचं बोलला. तिकडे बिगबॉसच्या घरात अविष्कार सोबत चर्चा करताना गायत्री नेहमी आविष्काराच्या दुसऱ्या लग्नाबाबत बोलताना दिसायची. पण आम्ही त्या विषयावर बोलताना तो विषय अर्धवट दाखवला गेला असल्याचं तो म्हणतो. त्यावेळी देखील मी असच म्हटलो होतो कि मी बिगबॉसच्या घरातून जर बाहेर पडलो तरीही व्यायामाला प्रथम प्राधान्य देईल त्याच बरोबर मला अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करायचं आहे. हे सगळसूरळीत चाललं आणि जर पुन्हा लग्न करायचा विचार मनात आला तरच मी लग्न करेल असं तो म्हणतो.

बिगबॉसच्या घरातून बाहेर पडताना स्नेहाचा निरोप घेतेवेळी स्नेहा वारंवार म्हणाली कि तुम्ही पुन्हा लग्न करणार तेंव्हा तुम्ही मला नक्की बोलवा मी नक्की येईल. तिच्या ह्या बोलण्यामुळेच आविष्काराच्या लग्नाची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.पण इतक्यात तरी अविष्कार लग्नाचा विचार करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या लग्नात तिला बोलवायचा किमान आता तरी प्रश्न उद्भवत नसल्याचं तो बोलतो. बिग बॉसच्या घरात अविष्कारचे सोनाली, विकास आणि विशाल सोबत छान बॉंडिंग जुळून आले होते. हे कलाकार अविष्कारला दादा म्हणत त्याच्याकडून सल्ला घ्यायला येत असत असं अविष्कार सांगतो. विशाल हा खूप चांगला खेळतो आणि तो पुढे जाऊन कदाचित तोच विनर बनेल अशी आविष्काराला अपेक्षा आहे. बिगबॉसच्या घरात माझी अनेकांशी मैत्री झाली आणि पुढे देखील आम्ही हि मैत्री टिकवून ठेऊ अशी त्याला आशा आहे. असो अविष्कार दारव्हेकर याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…