Breaking News
Home / जरा हटके / अविष्कारच्या ३ ऱ्या लग्नावर दुसऱ्या पत्नीची आगपाखड २ ऱ्या पत्नीने फोटो शेअर करत लावले गंभीर आरोप

अविष्कारच्या ३ ऱ्या लग्नावर दुसऱ्या पत्नीची आगपाखड २ ऱ्या पत्नीने फोटो शेअर करत लावले गंभीर आरोप

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये सहभागी झालेला आविष्कार दारव्हेकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. पत्नीसोबत काही खास फोटो शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ह्या गोजिरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, तू माझा सांगाती या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यासोबत तो विवाहबद्ध झाला मात्र शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी स्नेहाने अविष्कारला घटस्फोट दिला. बिग बॉसच्या घरात हे दोघे पुन्हा एकत्र आले मात्र या दोघांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अविष्कार पुन्हा विवाहबद्ध झाला त्यामुळे तो चर्चेत येऊ लागला. मात्र या तिसऱ्या लग्नावरून त्याच्या दुसऱ्या पत्नीने अनेक खुलासे उघड केलेले पाहायला मिळत आहेत. अविष्कारची दुसरी पत्नी स्मिता सावंत हिने या लग्नाला विरोध दर्शवला आहे.

aavishkar darvekar with wife smita
aavishkar darvekar with wife smita

अविष्कारचे तिसरे लग्न हे बेकायदेशीर असल्याचा दावा स्मिता यांनी केला आहे. याबाबत स्मिता स्पष्टपणे म्हणतात की, ‘लग्नानंतर दारू पिऊन रोज मारायचा रात्रभर घराबाहेर बसवून ठेवायचा घाणेरडे आरोप करायचा माझ्या प्रेगनान्सी मधेही खूप मारलं रात्रभर जमिनीवर बसवून ठेवायचा माझ्या 7 व्या महिन्या मधे घरात संपूर्ण तेल पाणी ओतून ठेवलं डाळ तांदूळ फेकून दिले आणि मला ते सगळं साफ करायला लावलं त्यात मी पडले तरी त्याने बघितलं पण नाही. बनवलेले जेवण फेकून द्यायचा आणि रात्री २-३ वाजता परत बनवायला लावायचा हातात जे मिळेल त्याने मारायचा चालत्या कार मधून ढकलून देत होता. त्याच्या न होणाऱ्या कामाचं, अपयाशाच खापर माझ्या माथी मारलं त्याच्या मते मी त्याला काम मिळवून द्यायला हवं होत. मी डायरेक्टर , प्रोडूसर शी बोलायला हवं होत. अशा बऱ्याच घटना आहेत की त्याने मला मानसिक, शारीरिक त्रास दिला आहे. याच्या बाकी फॅमिली ला सुद्धा माहीत होत की यांनी असे लग्न केलं आहे. पण तरीही कोणी मला सांगितलं नाही की कळू दिलं नाही. यांच्या स्वतःच्या बहिणी सोबत असे झालं असतं तरी हे असेच शंडा सारखे गप्प राहिले असते का? स्वतःला उच्च शिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारी ही दारव्हेकर फॅमिली अतिशय खालच्या पातळीची, नीच निघाली. याच्या वडिलांनीही हेच केलं. लग्नाची बायको असताना दुसरी बाई आणून ठेवली दुसरं घर केलं याच्या आई ने तरीही संसार केला. ज्या बाई सोबत हे घडलं आहे ती बाई स्वतःच्या सूने सोबत, जिच्या पदरात एवढा लहान मुलगा आहे तिच्या सोबत हे कसे काय होऊ देऊ शकते. तीच स्वतःच्या मुलाचं असे बेकायदेशीर लग्न कसे काय लावून देऊ शकते. किती असवेंदनशिल आहे हे स्त्री जातीला कालिंबा आहे ही बाई..’

darvekar wife smita swant
darvekar wife smita swant

मला तो सतत हेच सांगत राहिला की माझ्या कामाचं झालं की मी येईन पण दुसरीकडे तर त्याने या मुलीशी अनैतिक नात संबंध ठेवले आणि त्यानंतर गुपचूप लग्न केलं त्याने बिग बॉस मधेही माझा आणि आमच्या मुलाचा कुठेही उल्लेख केला नाही. माझा वा माझ्या मुलाचा कोणताही खर्च हा देत नाही. आमच्या हक्काचे पैसे हा त्या मुलीवर उडवतो आहे. कायदेशीर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लिव्हिंग रेलेशनशिप च प्रमाणपत्र काडल आहे.माझे आई वडील अतिशय साधी, सर्व सामान्य माणसं आहेत. मला कोणी भाऊ बहीण नाही कोणाचाही सपोर्ट नाही त्याचाच फायदा या लोकांनी घेतला आणि आम्हाला फसवल मला तो हेच सांगतो की मी 2 ला 5 लग्न केली तरी तू माझं काहीच बिगडवू शकत नाहीस कोणी माझ्या अंगाला हात पण लावू शकत नाही मारायचा तर लांब राहील त्याने त्याच्या पहिल्या लग्ना बद्दल ही मला खोटच सांगितलं होत.” हि त्याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेली प्रतिक्रिया आहे त्यावर आविष्कारच काय म्हणणं आहे हेही पाहणं गरजेचं आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *