जरा हटके

महानायकला अजून खूप काम केलेलं पाहायचंय… अशोक सराफ यांना जीवनगौरव मिळाल्याने प्रेक्षक व्यक्त करत आहेत हि खंत

अवघी मराठी सृष्टी ज्यांच्यामुळे ओळखली जाते ते अशोक मामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा सोहळा प्रेक्षकांना रविवारी २६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. हा सोनेरी क्षण प्रत्यक्षात ज्यांनी पाहिला त्या कलाकारांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. अगदी सिद्धार्थ जाधव, जयवंत वाडकर, अशोक शिंदे, महेश कोठारे, अलका कुबल यांच्यासह स्वतः अशोक सराफ सुद्धा यावेळी खूपच भावुक होऊन कंठ दाटून आल्याचे दिसत होते. सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेल्या अजरामर गाण्यावर नृत्य सादर केले. हे नृत्य सादर करून झाल्यावर सिद्धार्थ खूपच भावुक होतो आणि थेट समोरच बसलेल्या अशोक सराफ यांच्याकडे जाऊन पाया पडतो.

ashok saraf sachin pilgaonkar and mahesh kothare
ashok saraf sachin pilgaonkar and mahesh kothare

हा क्षण टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच आतुर झालेले पाहायला मिळतात. कारण आपल्या लाडक्या कलाकाराचा असा सन्मान होताना प्रेक्षकांना पाहायचं आहे. एकीकडे होत असलेला हा कौतुक सोहळा पाहून अशोक सराफ भावुक होऊन म्हणतात की, ‘तुमचं हे असं प्रेम पाहिलं ना की असं वाटतं दरवेळेला आपण नट म्हणूनच जन्माला यावं’. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दुसरीकडे असा पुरस्कार दिल्याने प्रेक्षक खंत सुद्धा व्यक्त करत आहेत. कारण जीवनगौरव पुरस्कार अशा कलाकारांना देण्यात येतो ज्यांची कारकीर्दी संपत आलेली असते. बालपणापासून ज्या कलाकाराने आपल्याला हसवलं, ज्यांचे चित्रपट पाहून आपण मोठे झालो त्या अशोक सराफ यांचा सन्मान होणे ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. मात्र हा जीवनगौरव पुरस्कार दिल्याने मनात एक भीती सुद्धा जाणवते. कलाकार आता थकलाय त्याला आता विश्रांतीची गरज आहे म्हणून जीवनगौरव पुरस्कार दिला जातो अशी खंत हे नाराज प्रेक्षक व्यक्त करत आहेत. पण खरंतर तास काही नाहीये यापूर्वी देखील विक्रम गोखले याना विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार २०१५ साली देण्यात आला होता आणि चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२१ साली देण्यात आला होता. त्यानंतर देखील त्यांनी मालिकांत कामे केली होती. अशोक सराफ यांना अजून खूप वेगवेगळ्या भूमिकेतून बघण्याची प्रेक्षकांची मनापासून इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वी अशोक सराफ यांना लॅरिंजायटीस या घशाचा आजाराने ग्रासले होते. त्यामुळे ते काही काळ कुठल्याच कार्यक्रमाला हजर राहू शकले नव्हते.

ashok saraf jivan gaurav puraskar
ashok saraf jivan gaurav puraskar

अगदी आपला लाडका मित्र महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ते येऊ शकले नव्हते. झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांचे धाकटे बंधू सोबत म्हणून आले होते. यावेळी मंचार अनेकजण त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते मात्र अशोक सराफ यांनी दिलेला आधार नाकारला आणि पुढे स्वतःच्या पायाने मंचावर चालत आले. या महानायकला अजून खूप काम करायचं आहे, अजून नव्या पिढीलाही त्यांच्या अभिनयाची कारकीर्द अनुभवायची आहे. कलाकाराला योग्य वेळी पुरस्कार दिले जात नाहीत अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. ज्येष्ठ दिवंगत गायिका सुलोचना चव्हाण यांना खूप उशिरा पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले मात्र त्यावेळी त्यांना आपण कशासाठी हा पुरस्कार घेतोय हेच त्यांना त्यावेळी समजत नव्हते. अगदी व्हीलचेअरवर बसून त्या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button