Breaking News
Home / जरा हटके / अशोक कुमार यांच्या मुलीचे दुःखद निधन मुलगी आणि जावई आहेत प्रसिद्ध कलाकार

अशोक कुमार यांच्या मुलीचे दुःखद निधन मुलगी आणि जावई आहेत प्रसिद्ध कलाकार

बॉलिवूड सृष्टीचे दादा मुनी अर्थात दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी भारती जाफरी यांचे मंगळवारी २० सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. भारती जाफरी यांनी हजार चौरसिया की मां सारख्या काही मोजक्या चित्रपटातून काम केले होते. पण वडिलांप्रमाणे त्यांना अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नव्हते. हमीद जाफरी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. भारती जाफरी यांच्या निधनाची बातमी त्यांचा जावई आणि हिंदी चित्रपट तसेच मालिका अभिनेता कवलजीत सिंग यांनी सोशल मीडियावर दिली होती. निधनाच्या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी चेंबूर येथील अशोक कुमार यांच्या घरी आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जवळच्या स्मशानभूमीत अग्नी देण्यात आला.

bharti jaffry with daughter
bharti jaffry with daughter

अभिनेत्री भारती जाफरी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड सृष्टीतील काही कलाकारांनी शोक व्यक्त केला. अशोक कुमार यांना तीन मुली आणि एक मुलगा. भारती , प्रीती, रुपा आणि अरुप या त्यांच्या चारही अपत्यांनी अभिनय क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. रुपा यांनी विनोदी अभिनेते देवेन वर्मा ह्यांच्यासोबत लग्न केले. देवेन वर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत प्रीती गांगुली यांनी हिंदी चित्रपटातून कॉमेडियन म्हणून काम केले. परंतु बेढब शरीरामुळे त्यांनी पुढे बारीक होण्याचे ठरवले. यामुळे त्यांच्या हातातून काम गेले. त्यानंतर अचानक वजन वाढणे आणि कमी होण्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. भारती जाफरी यांची दोन लग्न झाली होती असे बोलले जाते वीरेंद्र पटेल यांच्यासोबत दुसरे लग्न केल्यानंतर अनुराधाचा जन्म झाला. या दोघांची मुलगी अनुराधा पटेल ही देखील हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली. परुंतु ह्यावेळी तिची चर्चा मात्र झाली नाही. अभिनेत्री अनुराधा पटेल यांनी लव्ह इन गोवा या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाउल टाकले होते. रेडी, राधे श्याम, आयेशा, दिवाने, जंटलमन, ज्योती, लोहे के हाथ अशा चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या.

anuradha patel and kiyara advani
anuradha patel and kiyara advani

हिंदी चित्रपट अभिनेते कवलजीत सिंग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांना दोन अपत्ये असून देखील समाजाला प्रेरणा देत त्यांनी एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे. अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी यापूर्वी देखील काही मुला मुलींना दत्तक घेतलं त्यांच्या नावापुढे आपलं नाव लावलं आहे. इतकाच काय तर शाळेपासून ते लग्नापर्यंत अनेक मुलींचा खर्च देखील बऱ्याच अभिनेत्यांनी केलेला पाहायला मिळतो. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची आई आणि अभिनेत्री अनुराधा पटेल या दोघी सावत्र बहिणी आहेत हे देखील ऐकेना माहित नसेल. त्यामुळे अनुराधा पटेल या कियाराची मावशी आहेत. तर अशोक कुमार हे कियाराचे पणजोबा आहेत. त्यामुळे बॉलिवूड सृष्टीतील या कलाकारांचे नाते तसेही फारच गुंतागुंतीचे पाहायला मिळते. अनेकांना कियारा अडवाणी हि स्वतः काम करून आपलं नाव कमावलं असं वाटण स्वाभाविक आहे पण सत्य काही वेगळंच आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.