Breaking News
Home / जरा हटके / मुंबईत या ठिकाणी अभिनेत्रीने सुरू केले हॉटेल अरुण नलावडेसह मान्यवरांनी लावली हजेरी

मुंबईत या ठिकाणी अभिनेत्रीने सुरू केले हॉटेल अरुण नलावडेसह मान्यवरांनी लावली हजेरी

अभिनय क्षेत्रातील बरीचशी कलाकार मंडळी पर्यायी मार्ग म्हणून हॉटेल व्यवसायाकडे वळतात. मराठी सृष्टीतील प्रिया बेर्डे, प्रिया मराठे, खुशबू तावडे, शशांक केतकर, आनंद काळे यांनी कॅफे तसेच हॉटेल व्यवसाय सुरू केलेला पाहायला मिळाला. काही महिन्यांपूर्वीच प्रिया बेर्डे यांनी पुण्यात चख ले याच नावाने आणखी एक हॉटेल सुरू केलेले पाहायला मिळाले. त्यामुळे या कलाकारांना हॉटेल व्यवसायात चांगलं यश मिळत असल्याचे दिसते. मराठी चित्रपट अभिनेत्री सिया पाटील हिने देखील हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे धाडस केले आहे. नुकतेच मुंबईतील पवई उपनगरात यादव नगर , चांदीवली येथे ‘गाव curry चव महाराष्ट्राची’ या नावाने तिने पारंपरिक जेवणाची मेजवानी देणारे हॉटेल सुरू केले आहे.

actress siyaa patil hotel
actress siyaa patil hotel

काल रविवारी ३ जुलै २०२२ रोजी या हॉटेलचे ग्रँड ओपनिंग पार पडले. यावेळी डीसीपी सोमनाथ घारगे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. तर मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे तसेच प्रसाद पाध्ये यांनी देखील हजेरी लावून सिया पाटीलला शुभेच्छा दिल्या. सिया पाटील हिने मराठी चित्रपट सृष्टीत नायिका तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमातून सियाला डान्समध्ये नेहमी बक्षिसं मिळायची पण आपल्याला इन्स्पेक्टर व्हायचंय या उद्देशाने ती पुन्हा आपल्या मार्गावर परतायची. मात्र कॉलेजमध्ये गेल्यावर मॉडेलिंगचे वेध तिला लागले आणि यातूनच काही जाहिरातींमधून तिला झळकण्याची संधी मिळाली. पुढे नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली. मात्र तिने घरून कुठलीही आर्थिक मदत घेण्याचे टाळले. दरम्यान आपण काहीतरी करायचं या हेतूने पुणे सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपावर जॉब केला, दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले यातून स्वबळावर शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च भागू लागला. चल गंमत करू हा तिने साकारलेला पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर गर्भ, बोला अलख निरंजन, डोंबिवली रिटर्न, पारख नात्यांची, धूम२ धमाल, गाव थोर पुढारी चोर, चल धर पकड अशा अनेक चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येत राहिली.

actor arun nalawade in hotel gaon curry
actor arun nalawade in hotel gaon curry

सिया अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेच एक हॉटेल व्यावसायिक असण्यासोबतच ती शिर्डी येथे ‘Shion green energy’ हा प्लांट सांभाळत आहे. या प्लांटमध्ये शेतकऱ्यांकडील शेतात राहिलेला पालापाचोळा खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विटा बनवल्या जातात. या विटांचा उपयोग वेगवेगळ्या कारखान्यांच्या भट्टीमध्ये केला जातो. या व्यवसायातून सियाला चांगले उत्पन्न तर मिळतेच शिवाय शेतकऱ्यांना देखील आर्थिक लाभ होतो. याशिवाय मिलेनियम पॅराडाईज , ठाकूर व्हिलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे तिने “S.Sense salon and spa” या नावाने सलून सुरू केले आहे त्यामुळे एक अभिनेत्री सोबतच सिया पाटील प्रयोगशील उद्योजिका अशीही ओळख मिळवताना दिसत आहे. अभिनेत्री सिया पाटील हिला नव्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *