महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या अनेक कॉमेडी शो मधून अरुण कदम यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांच्या आगरीकोळी भाषेतील बोलणे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहे. घंटा, सासूबाई गेल्या चोरीला, शिनमा, लोणावळा बायपास या मराठी चित्रपटासोबत त्यांनी दिला तो बच्चा है जी, चलता है यार, थँक्स माँ या हिंदी चित्रपटातही आपल्या विनोदी अभिनयाची छाप पाडली. अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम आहेत.

सुकन्या ही त्यांची एकुलती एक मुलगी. सुकन्या हिचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. सुकन्या ही सागर पोवळे सोबत विवाहबद्ध होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या या दोघांच्यात साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तिच्या साखरपुडा सोहळ्याला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे. सुप्रिया पठारे, जयवंत वाडकर यांनी देखील हजेरी लावली होती. अरुण कदम यांनी मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. मधल्या काळात तिने वडील अरुण कदम यांच्यासोबत टिकटॉक सारखे व्हिडीओज बनवले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. फुल स्टॉप एंटरटेनमेंट येथे सुकन्या ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे. तर सागर पोवळे हा ब्रीविंग कन्सल्टंट, हेड ब्रिवर म्हणून बिअर क्षेत्रात कार्यरत आहे. सुकन्या कदम आणि सागर पोवळे यांच्या साखरपुड्यानिमित्त त्यांचे खूप खूप अभिनंदन….
