Breaking News
Home / जरा हटके / पल्लवी विचारे यांनी लोकांना केली कळकळीची विनंती अर्धवट बघून काहीही अर्थ लावू नये

पल्लवी विचारे यांनी लोकांना केली कळकळीची विनंती अर्धवट बघून काहीही अर्थ लावू नये

मराठी चित्रपट मालिका अभिनेता अंशुमन विचारे आणि पत्नी पल्लवी विचारे यांची मुलगी अन्वी विचारे ही सोशल मिडिया स्टार आहे. अन्वी विचारे हिचा युट्युब चॅनल आहे त्याला लाखो लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मीडिया वर स्टार होणं ही सहजासहजी मिळालेली गोष्ट नसते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामागे त्या प्रत्येकाची जीवतोड मेहनत असते अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी मिळवलेलं हे यश असतं. मात्र जेव्हा या यशाबद्दल वाईट बोललं जातं तेव्हा कुठेतरी ठोस पाऊल उचलणे आवश्यक असते असे अन्वीच्या आईचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या वाईट कमेंट्सना इथून पूढे ब्लॉक केले जाईन असा निर्णय पल्लवी यांनी घेतला आहे.

anshuman vichare family
anshuman vichare family

हा निर्णय घेण्यामागे त्यांचा मुख्य हेतू हाच आहे की आपण बनवलेल्या व्हिडिओतून सकारात्मक ऊर्जा मिळायला हवी. महत्वाचं म्हणजे अन्वीचे व्हिडीओ बनवण्यामागे केवळ पैसा मिळावा हा उद्देश त्यांचा मुळीच नव्हता. लॉकडाऊनच्या दरम्यान सहज म्हणून त्यांनी अन्वीचा एक व्हिडिओ बनवला होता. तो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. अन्वी जेव्हा कधी बाहेर जायची तेव्हा तिला सगळे जण ओळखू लागले होते. आपल्या मुलांच्या प्रसिद्धीबाबत पालक नेहमीच सिक्युअर असतात. अन्वीचे पालकही तिच्याबाबत सिक्युअर आहेत. आपल्या मुलीला मिळालेली प्रसिद्धी कुठे वाईटमार्गाने जाऊ नये याची ते नेहमी काळजी घेतात. तिच्या व्हिडिओमधून अनेकांना प्रेरणा मिळते एक नवी ऊर्जा मिळते अशा कमेंट्स, मेसेजेस त्यांना नेहमी मिळतात त्याचमुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र कुठेतरी वाईट बोललं जातं हे थांबवलं पाहिजे. अन्वीचे जे चाहते आहेत ते नेहमी चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. कधीतरी कोणीतरी येऊन अशा निगेटिव्ह प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांना वेळीच आळा घालायला हवा या विचाराने पल्लवी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पल्लवी या वकील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वकिलीचे काम केले आहे.

anvi anshuman vichare
anvi anshuman vichare

आता घरी राहूनही त्या घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या पतीपत्नीला मोफत कौंसलिंग करण्याचे काम करतात. ज्या लोकांना वकिलाची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यांच्या साठी त्या ९० टक्के सवलतीमध्ये हे काम करून देतात. अन्वीच्या व्हिडिओमधून ती लाडावलेली मुलगी आहे, तिला बाहेरचं जास्त खाऊ घालू नका, तुमच्या घरात खूप पसारा असतो अशा निगेटिव्ह कमेंट्स आता इथून पुढे ब्लॉक केल्या जातील असे पल्लवी विचारे यांनी म्हटले आहे. आम्हाला जे सुख मिळालेलं नाही ते आम्ही तिला देण्याचा प्रयत्न करतो आम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहोत त्यामुळे आम्ही जे कमावतो त्यातून तिला सुख मिळायला हवं. या व्हिडिओतून पैसे मिळावे हा हेतू नसून त्यातून तिच्या चाहत्यांना एक सकारात्मक ऊर्जा मिळावी असा आमचा मानस आहे. त्यामुळे जर कोणी निगेटिव्ह कमेंट्स करत असतील तर त्याला लगेचच ब्लॉक करण्यात येईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आमच्या व्हिडिओवर तुमच्या काही साजेशन्स असतील तर त्याचा मी नक्कीच विचार करेन असेही त्यांनी म्हटले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *