येत्या काही दिवसात झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होत आहेत. प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रसारित होत असलेल्या जवळपास सर्वच मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेनंतर आता मन उडू उडू झालं ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेत हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी दिपू इंद्रा ची भूमिका साकारली होती. लवकरच दिपू आणि इंद्रा लग्न करणार असून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. या मालिकेच्या जागी ‘तू चाल पुढं’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार ही मालिका रात्री ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

तू चाल पुढं ही मालिका एका गृहिणीची आहे जीची स्वप्न मोठी आहेत. ही स्वप्न पूर्ण करत असताना येणारे अडथळे पार करत तिला पुढे जायचं आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या कथानकाप्रमाणे या मालिकेतून प्रेक्षकांना घरसंसारत रमलेल्या एका गृहिणीची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. दीपा परबने आजवर अनेक हिंदी मालिकांमधून काम केले आहे मात्र आता ती प्रथमच मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. अंड्याचा फंडा या चित्रपटात ती झळकली होती मात्र ती मालिका सृष्टीत पाहायला मिळाली नाही. अंकुश आणि दिपा दोघेही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकामध्ये काम करत असत. त्याचदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. छानसे करियर सेट झाल्यानंतरच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. भरत जाधव आणि केदार शिंदे हे अकुंशचे जिगरी मित्र मंडळी.

कॉलेजमध्ये असताना हे सर्व मिळून नाटकांच्या स्पर्धा गाजवत होते. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम केले होते. त्यानंतर दिपा परब अनेक जाहिरातींमधून आणि हिंदि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.’छोटी माँ’, ‘थोडी खुशी थोडी गम’, ‘रेत’ या हिंदी मालिकांमध्ये दीपाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तू चाल पुढं या नव्या मालिकेत दीपा परब सोबत धनश्री काडगावकर, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, अन्नपूर्णा विठ्ठल अशी बरीचशी कलाकार मंडळी झळकणार आहेत. धनश्री काडगावर या मालिकेत नणंदेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे धनश्री पुन्हा एकदा विरोधी भूमीका साकारताना दिसणार आहे. या नवीन मालिकेसाठी सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.