तुम्ही ह्याला ओळखलंत ? मुंबईच्या रस्त्यावर पोतराजबनून फिरतोय मराठी सृष्टीतला हा प्रसिद्ध अभिनेता

मालिका चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना वेगवेगळ्या दिव्यातून जावं लागतं. त्यासाठी शारीरिक मेहनत आणि वाटेल ते करण्याची तयारी दाखवावी लागते. आज मुंबईकरांना असाच काहीसा प्रकार मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेता अंकित मोहन पोतराजा च्या वेशात येऊन रस्त्यावर फिरताना दिसला. त्याला पाहायला लोकांची गर्दी तिथे जमली होती. अनेकांनी पोतराजाच्या गेटअपमध्ये अंकित मोहन आहे ते ओळखले होते. तर काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अंकितचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतो. अंकीतने असे का केले असावे याचे अंदाज प्रेक्षकांकडून बांधण्यात येत आहेत.

एखाद्या चित्रपटाचे हे प्रमोशन असावे त्यासाठी अंकीतने हा गेटअप केला असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र हा कुठला चित्रपट नसून अंकित एका व्हिडीओ सॉंग मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्याचे हे प्रमोशन आहे. महादेवाने सांगितलंय असे म्हणत अंकित भर रस्त्यात आपल्या अल्बमच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर पोतराज बनून उतरला आहे. व्हिडीओ पॅलेस इंडिया प्रस्तुत ओंकार माने दिग्दर्शित “मन थारी राहिना” हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं ज्यांनी ज्यांनी पाहिलंय ते एक गाणं नसून ब्लॉक बस्टर चित्रपट असावा अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे. त्यामुळे मन थारी राहिना हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. अंकित मोहन सोबत वर्षा रेवडे या गाण्यात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. पोतराज स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके मारत रस्त्यावर फिरून देवीची आराधना करतो.मागासवर्गीय जातीतील लोकसंस्कृतीचा उपासक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अशाच एका पोतराजची जोवनकथा या म्युजिक व्हिडिओतून सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. अंकीतने या भूमिकेसाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येते.

रस्त्यावर जाऊन आसुडाचे फटके मारून घेत तो पोतराजची कहाणी समोर आणण्याचार प्रयत्न करतो आहे. अंकित मोहन हा मराठी चित्रपट सृष्टीतला एक मेहनती कलाकार आहे. भारदस्त शरीरयष्टी मिळवण्यासाठी तो रोज न थकता मेहनत करत असतो. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटातून त्याने अनेक दर्जेदार भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. अंकीतकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. मराठी हिंदी चित्रपटातून तो लवकरच नवनवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मन थारी राहिना ह्या त्याच्या गाण्याला युट्युबवर चांगली पसंती मिळत आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.