मराठी सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेत विश्वासरावने ये रे ये रे पैसा, फक्त लढ म्हणा, लपून छपून, बस स्टॉप, पोश्टर गर्ल, आंधळी कोशिंबीर, पोश्टर बॉईज सारख्या अनेक चित्रपट आणि ऊन पाऊस, कळत नकळत मालिकेतून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोचे सूत्रसंचालन देखील त्याने केले होते. चित्रपट, मालिका असो किंवा नाटक त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून नेहमीच दाद मिळते.

२०१८ साली अनिकेत विश्वासराव अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत विवाहबद्ध झाला. हृदयात संमथिंग समथिंग या चित्रपटात हे दोघेही एकत्रित झळकले होते. स्नेहा चव्हाणने मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री स्नेहा चव्हाणची आई “राधिका चव्हाण” या देखील मराठी मालिका अभिनेत्री आहेत. सोनी टीव्ही वरील ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत त्यांनी अभिनय साकारला होता. ही त्यांची पहिली टीव्ही मालिका ठरली. या मालिकेअगोदर त्यांच्या डान्सचा व्हिडीओ प्रसार माध्यमातून व्हायरल झाला होता. राधिका चव्हाण या केवळ अभिनेत्री नसून कार्पोरेट क्षेत्रात होस्ट म्हणून काम करत आहेत. आजवर राजकीय इव्हेंट, क्रिकेट इव्हेंट असो वा कार्पोरेट इव्हेंट अशा मोठमोठ्या मंचावर त्यांनी होस्ट म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली आहे. मेरे साई मालिकेमुळे त्यांना अभिनयाची संधी मिळाली. पुढे देखील अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्यांची सासू राधिका चव्हाण ह्या वेगवेगळ्या मालिकांत पाहायला मिळतील त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा …