जरा हटके

पत्नी स्नेहाने लावलेल्या आरोपांवर मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावनं सोडलं मौन

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने तिचा पती अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी अलंकार पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. स्नेहा चव्हाण ही अनिकेत विश्वासराव याच्यासोबत २०१८ साली विवाहबद्ध झाली होती. मात्र लग्नानंतर डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान तिची शारीरिक आणि मानसिक छळवणूक केली असल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत मला लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देतो, मारहाण, गळा दाबून जीवे मारण्याच्या धमक्या देतो शिवाय मी त्याच्यापेक्षा वरचढ ठरू नये म्हणूनही त्रास देतो असेही तिने तिच्यात तक्रारीत म्हटले आहे.

aniket vishwasrao with wife
aniket vishwasrao with wife

स्नेहा सध्या पुण्यातील कोथरूड येथे तिच्या माहेरी राहत आहे ती राहत असलेली हद्द अलंकार पोलीस ठाण्यात येत असल्याने तिने ही तक्रार तेथे नोंदवली होती असे पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी म्हटले आहे. हे सर्व आरोप होत असताना अनिकेत विश्वासराव याने मात्र काही काळ मौन बाळगले होते मात्र आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले जात असलेले पाहून नुकतेच त्याने स्नेहाच्या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, स्नेहा चव्हाण ५ फेब्रुवारी २०२१ पासून माझ्यासोबत राहत नाही. ५ फेब्रुवारी रोजीच ती घर सोडून माहेरी निघून गेली होती. जाताना तिने सोबत सोन्याचे दागिने देखील घेतले होते. तिलाच माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं त्यामुळे तिने माझ्याकडे २५ लाखांची पोटगी देखील मागितली होती. मी ही पोटगी देण्यास तिला नकार दिला होता. शिवाय कायदेशीररित्या आपण कोर्टात जाऊन घटस्फोट घेऊ असं म्हटल्यावर स्नेहा आणि तिच्या कुटुंबीयांकडून मला धमक्या येऊ लागल्या. मी जर पैसे दिले नाहीत तर माझं नाव बदनाम केलं जाईल अशी धमकी मला मिळत होती.

actor aniket vishwasrao
actor aniket vishwasrao

पण या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. फेब्रुवारी महिन्यापासून स्नेहा माझ्यासोबत राहत नाही तिची जर छळवणूक होत होती तर हे सांगायला तिला १० महिने का लागतात?… आपल्यावर अत्याचार होतोय हे १० महिन्यांनी तिला जाणवलं का?.. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्याच दिवशी तीने आमच्या विरोधात तक्रार का दाखल केली. माझ्या व माझ्या कुटुंबाचा आनंद तिला पहावला नाही. स्नेहा आणि तिचे कुटुंब आमच्या विरोधात हे षडयंत्र रचत आहेत आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देत आहेत….असे अनिकेत विश्वासराव यांचे म्हणणे आहे. ह्या सर्व प्रकरणानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच धक्का बसला आहे. अनिकेत आणि स्नेहा ह्यांच्या आयुष्यात असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सोशिअल मीडियावर ह्या दोघांचे अनेक फोटो मन मोहून घेतात त्यामुळे ह्यांच्या आयुष्यात असं काही घडेल याची कल्पना देखील कोणी केली नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button