अनेक मराठी दिग्गज कलाकार हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांत खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. सदाशिव अमरापूरकर, सयाजी शिंदे, दीपक शिर्के, महेश मांजरेकर, विजू खोटे, मोहन जोशी असे अनेक कलाकार आपल्याला खलनायकाच्या यादीत पाहायला मिळतील. त्यातील एक महत्वाचा अभिनेता म्हणजे अनंत जोग. अनंत जोग हे हिंदी आणि मराठी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण काही मराठी मालिकांत त्यांनी हळव्या भूमिका देखील साकारल्या आहेत.

रावडी राठोड,नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक,सरकार, लाल सलाम, रिस्क, सिंघम ह्या सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या खास आठवणीत राहिल्या. मुलांच्या आवडीच्या शक्तिमान ह्या मालिकेत देखील त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. ई टीव्ही मराठी वरील गंध फुलांचा गेला सांगून ह्या मालिकेत त्यांनी हळव्या आणि चांगल्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनतर मात्र ते खूपच कमी वेळा अभिनय साकारताना पाहायला मिळाले. अनंत जोग यांच्या पत्नीचे नाव आहे उज्जवला जोग असे आहे. उज्जवला जोग याही टीव्ही मालिका तसेच रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. एक आई आणि मावशी म्हणून त्यांनी अनेक मालिकांत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन या मालिके त्यांनी काम केली आहेत. सूर्याची पिल्ले,ढोल ताशे,लुका छुपी या नाटकात त्यांनी काम केले आहे. अनंत आणि उज्जवला जोग यांना क्षिती नावाची मुलगी आहे. क्षिती जोग हीदेखील एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वानाच ठाऊक असेल. अनेक हिंदी आणि मराठी मालिकांत ती पाहायला मिळते. क्षिती जोग हीच पती हेमंत ढोमे हा देखील अभिनेता, डायरेक्टर, आणि प्रोड्युसर म्हणून परिचित आहे.