स्टार प्रवाहवाहिनीवर ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ मालिका प्रसारित होत आहे मालिकेत शांतनू आणि पल्लवीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मालिकेत सध्या गावी असलेल्या बाबनच्या आईच्या आजारपणामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याला मदत म्हणून पल्लवी विद्यार्थ्यांकडून निधी गोळा करताना दिसते मात्र आता शांतनूच्या मदतीने बबनची आर्थिक अडचण लवकरच दूर होणार आहे. मालिकेतला शांतनू साकारला आहे अभिनेता अक्षर कोठारी याने. तब्बल दोन वर्षानंतर अक्षर कोठारी स्वाभिमान मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकला. आज त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…

मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील हँडसम कलाकार म्हणून अक्षर कोठारीने स्वतःची एक वेगळीच छाप पाडली आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अक्षरला हवी तशी भूमिका साकारण्याची संधी या मालिकेमुळे मिळाली आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले. आराधना, छोटी मालकीण अशा मालिकेतून तो दमदार भूमिकेत पाहायला मिळाला होता. या सर्व भूमिकेपासून स्वाभिमान मालिकेतून तो काहीशा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. उच्चशिक्षित, हुशार, सुसंस्कृत आणि तितकाच विश्वासू अशा स्वरूपाची त्याची ही भूमिका तितकीच भाव खाऊन जाताना दिसते. चाहूल २ मालिकेतील त्याने साकारलेली सर्जाची भूमिका देखील खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून अक्षरच्या पत्नीने देखील एकत्रित काम केले होते. अक्षरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मानसी नाईक हिने चाहूल मालिकेत सर्जेरावची पत्नी मंदाकिनी साकारली होती. रिअल लाईफ मधले हे कपल मालिकेद्वारे ऑन स्क्रीनही हिट ठरले होते. ललित २०५, स्वराज्यजननी जिजामाता, गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती या आणि अशा विविध मालिकेतून मानसी नाईक हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.