Breaking News
Home / जरा हटके / २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं भावाचे आजारपण आणि पत्नीपासून विभक्त होणे

२०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं भावाचे आजारपण आणि पत्नीपासून विभक्त होणे

मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील हँडसम कलाकार म्हणून अक्षर कोठारीने स्वतःची एक वेगळीच छाप पाडली आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अक्षरला स्वाभिमान मालिकेतून हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले होते. आराधना, छोटी मालकीण अशा मालिकेतून तो दमदार भूमिकेत पाहायला मिळाला होता. या सर्व भूमिकेपासून स्वाभिमान मालिकेतून तो काहीशा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. उच्चशिक्षित, हुशार, सुसंस्कृत आणि तितकाच विश्वासू अशा स्वरूपाची त्याची शांतनूची भूमिका तितकीच भाव खाऊन जाताना दिसते. चाहूल २ मालिकेतील त्याने साकारलेली सर्जाची भूमिका देखील खूपच लोकप्रिय झाली होती.

manasi naik and akshay
manasi naik and akshay

या मालिकेतून अक्षरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने देखील एकत्रित काम केले होते. अक्षरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मानसी नाईक हिने चाहूल मालिकेत सर्जेरावची पत्नी मंदाकिनी साकारली होती. रिअल लाईफ मधले हे कपल मालिकेद्वारे ऑन स्क्रीनही हिट ठरले होते. ललित २०५, स्वराज्यजननी जिजामाता, गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती या आणि अशा विविध मालिकेतून मानसी नाईक हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र सर्व काही अलबेल असतानाच या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २७ मे २०२१ रोजी अभिनेत्री मानसी नाईकने कांदिवली स्थित धृवेश कापुरीया सोबत दुसरा संसार थाटला. घटस्फोट झाल्यानंतर मात्र अक्षर पुरता खचून गेला. कित्येक रात्र त्याने अशाच जागून काढल्या. यासंदर्भात नुकताच तो मीडियाशी मनमोकळेपणाने बोलला. २०१९ हे वर्ष माझ्यासाठी सर्वार्थाने खूपच काठीण गेले. पत्नीसोबत विभक्त होणे आणि भावाचे आजारपण यामुळे मी कित्येक रात्र जागून काढल्या असे अक्षर म्हणतो.

actor akshay kothari
actor akshay kothari

माझा धाकटा भाऊ अमोद कोठारी याला एरिथमिया म्हणजेच हृदयाच्या अनियमित ठोक्याचा आजार होता. माझ्या भावाला काही तरी होईल या भीतीने मी कित्येक रात्री जागून काढल्या. एखाद्या कलाकारासाठी त्याच्या खाजगी आयुष्यात काय घडतंय याची पर्वा न करता जगावं लागतं. त्यानंतर मी छोटी मालकीण या मालिकेत सक्रिय झालो परंतु माझा भाऊ जेव्हा खूप कठीण परिस्थितीतून जात होता त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असणारे स्टाफ माझ्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त होते. त्यावेळी मला जाणीव झाली की एखाद्या अभिनेत्याचे आयुष्य खूप वेगळे असते. अभिनेता हा नेहमीच हसतमुख असला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. माझ्या आयुष्यातल्या ह्या सर्व गोष्टींनी मला चंगला कलाकार घडविण्यास मदत केली. प्रत्येक कलाकार ह्या दुःखातून गेलेला असतो म्हणूनच तो उत्तम अभिनेता बनतो. अभिनेता बनायचं हा निर्णय मी घेतला होता ती माझी आवड होती. मला ह्या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूप सहकार्य केले या क्षेत्रात येण्यासाठी साठी मी पाच वर्षे त्यांच्या परवानगीची वाट पाहत होतो. भावाला गमावणे हे माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होतं आयुष्यातला हा संघर्ष मला व माझ्या कुटुंबासाठी प्रेरक आहे असे मानतो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *