Breaking News
Home / जरा हटके / हृताच्या लग्नात अजिंक्य का नव्हता? हृताच्या सासूंनी सांगितलं पुन्हा आम्हाला ओळखही दाखवू नकोस

हृताच्या लग्नात अजिंक्य का नव्हता? हृताच्या सासूंनी सांगितलं पुन्हा आम्हाला ओळखही दाखवू नकोस

हजारो तरूणांची क्रश असलेल्या हृता दुर्गुळेनं तिचा प्रियकर प्रतीक शाहशी नुकतच लग्न केलं. तिच्या लग्नाचा प्रीइव्हेंट झाला नसला तरी लग्न मात्र दणक्यात झालं. हृताकडून मराठी सिनेमा, मालिका विश्वातील जवळपास सगळे सेलिब्रिटी लग्नात हजर होते. प्रतीक हिंदी मालिकाक्षेत्रात असल्यामुळे त्याच्याकडून हिंदी कलाकारांना निमंत्रण होतं. हृताचे आजपर्यंतचे ऑनस्क्रिन सगळे जोडीदार तिच्या लग्नाला आले असताना एक व्यक्ती मात्र कुठेच दिसली नाही. हृताच्या साखरपुड्यात मन उडू उडू झालं च्या टायटल साँगची सिग्नेचर स्टेप करून धमाल उडवणारा इंद्रा म्हणजे अजिंक्य राऊत हृताच्या लग्नात का नव्हता या प्रश्नाने हृता आणि इंद्राच्या चाहत्यांना खूपच अस्वस्थ केलं होतं. पण आता इंद्राचं हृताच्या लग्नाला न येण्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. अजिंक्य हा नेमका हृताच्या लग्नावेळी त्याच्या जन्मगावी परभणीला गेला होता.

actress hruta pratik shah with mother
actress hruta pratik shah with mother

अर्थात त्याच्या परभणी दौऱ्याचंही खास कारण होतं आणि त्यामुळेच अजिंक्यच्या मनात असूनही तो हृताच्या लग्नाला येऊ शकला नाही. अजिंक्यच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस १७ मे रोजी होता आणि हृताचं लग्न १८मे रोजी. अजिंक्यने परभणीला जाण्यासाठी सुट्टी घेतली होती. याचा किस्सा सांगताना अजिंक्य म्हणाला, मला माझी बहिण म्हणाली की एरव्ही शूटिंगमध्ये बिझी असतोस पण अशा फॅमिली फंक्शनसाठी वेळ काढायला हवा. आईबाबांची अॅनिव्हर्सरी चुकवू नकोस. खरंतर बहिण सहजच बोलून गेली पण माझ्या मनात ती गोष्ट राहिली होती म्हणूनच मी परभणी जायचा प्लॅन केला. दरम्यान इकडे हृताच्या लग्नाचा मुहूर्त १८ मे चा होता. मी ठरवूनही १७ ला निघालो असतो तरी मुंबईत सकाळी पोहोचलो नसतो. अजिंक्य आणि हृता यांची इतकी चांगली मैत्री आहे की हृतानेही अजिंक्यचं लग्नाला न येण्याचं कारण समजून घेतलं. उलट हृताही अजिंक्यला म्हणाली, की तू घरी थांब, आईबाबांसोबत एन्जॉय कर. तर जेव्हा आईबाबांना अजिंक्यनं सांगितलं की हृताचं लग्न आहे पण ती जाऊ शकलो नाही तेव्हाअरे, ती तुझी सहकलाकार आहे. तिच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. आमची तर अॅनिव्हर्सरी आहे , आणि आम्ही आता म्हातारे झालो, एन्जॅाय करण्याचे दिवस तुमचे आहेत असं म्हणून आईबाबा अजिंक्यलाच ओरडले.

hruta durgule and mugdha shah
hruta durgule and mugdha shah

एकीकडे हृताचं लग्न आणि दुसरीकडे आईबाबांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी अशा कात्रीत अजिंक्य अडकला होता. हृताच्या सासू अभिनेत्री मुग्धा शाह यांनीही अजिंक्यकचे चांगलेच कान पकडले. त्यांनी तर त्याला दमच भरलाय की, हृताच्या लग्नाला आला नाहीस ना, आता आम्हाला ओळखही दाखवायची नाही. अर्थात यामध्ये चेष्टेचा भाग असला तरी अजिंक्यचं हृताच्या लग्नात नसणं हे प्रत्येकालाच काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लावणारं होतं. सध्या हृता हनिमूनला गेली आहे. त्यामुळे मन उडू उडू झालं मालिकेच्या सेटवर अजिंक्य तिला खूप मिस करतोय. आता ती परत आल्यावर तिची समजूत काढेन असंही अजिंक्यनं सांगितलं. अजिंक्य म्हणाला, की लग्नाच्या गडबडीत जरी हृताने मला माफ केलं असलं तरी ती जेव्हा सेटवर परत येईल तेव्हा मला पार्टी मिळेल की शिक्षा हे अजूनही तरी माहिती नाही. पण हृता माझी खूप छान मैत्रीण असल्याने समजून घेईल अशीही त्याला खात्री आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *