Breaking News
Home / जरा हटके / लेकिसोबत विशाळगडावर गेले असता अभिनेते अजय पुरकर यांनी शिवप्रेमींना केले हे आवाहन

लेकिसोबत विशाळगडावर गेले असता अभिनेते अजय पुरकर यांनी शिवप्रेमींना केले हे आवाहन

शिवराज अष्टकाच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. अशातच बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या भूमिकेमुळे अजय पुरकर प्रसिद्धीच्या झोतात आले. नुकतेच अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं त्यात त्यांनी गृहप्रवेश देखील केला. आपल्या लेकिसह त्यांनी विशाळगडावर जाऊन बाजीप्रभू देशपांडे आणि फुलजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी शिव भक्तांना आणि शिवप्रेमींना नम्र आवाहन करत व्हिडिओच्या माध्यमातून एक मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अजय पुरकर तमाम शिवप्रेमींना आवाहन करत म्हणतात की, आज बाजीप्रभूंचे दर्शन घेत असताना महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकर्षाने आठवण येत आहे.

actor ajay purkar
actor ajay purkar

आज जर ते आपल्यात असते तर ते १०१ वर्षांचे झाले असते.लहानपणापासून ज्यांनी आमच्या रक्ताच्या धमन्यांमधून शिवाजी महाराज पसरवले ते महानाट्यन ज्यांनी घडवलं ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. ‘जाणता राजा’ हे ते नाटक हे नाटक अक्षरशः पाठ झालं होतं आणि तेव्हापासूनच शिवचरित्राची ओढ लागून राहिली होती. आज बाबासाहेबांचं कार्य मागे वळून पाहताना असं वाटतं की किती महान कार्य घडलेलं आहे त्या माणसाच्या हातनं. फक्त महाराष्ट्रातच नाही, देशात नाही तर विदेशात देखील असंख्य प्रयोग जाणता राजा या महानाट्याचे झाले. आणि त्यामुळे जगभरात पसरलेल्या मराठी माणसांच्या मनावरती छत्रपती शिवाजी महाराज कायमचे कोरले गेले. आमचा छोटासा प्रयत्न आहे की श्री शिवराज अष्टकाद्वारे जे चित्रपट केले त्यावर तुम्ही सगळ्यांनीच प्रेम दिलंत असेच प्रेम कायम राहुद्यात. अजून एक आवाहन मलस करायचं आहे की, आपण असंख्य लोकं दरवर्षी जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा पावनखिंडीचं दर्शन घेताच पण मुद्दामहून आज सर्वांनाच आवाहन करतो की जसं तुम्ही पावनखिंडीचं दर्शन घेता तसंच इथे ही दोन विररत्न आहेत ज्यांच्या समाध्या इथं आहेत बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूयांच्या त्यांच्या समधीचं दर्शन अवश्य येऊन घेत जा. इथे फार समाधान होईल या वीर रत्नांचं दर्शन घेऊन याचा जरूर विचार करा!.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *