Breaking News
Home / जरा हटके / हे कारण सांगत “मुलगी झाली हो” मालिकेला अभिनेते अजय पुरकर ह्यांनी ठोकला रामराम

हे कारण सांगत “मुलगी झाली हो” मालिकेला अभिनेते अजय पुरकर ह्यांनी ठोकला रामराम

मालिकांमध्ये एखाद्या नव्या कलाकाराची एन्ट्री होणे हे जितकं प्रेक्षकांच्या सवयीचे झालं आहे तितकंच एखादी भूमिका करत असतानाच मालिकेतून बाहेर पडणारे कलाकारही आता प्रेक्षकांच्या सवयीचे झालं आहे. पण दरवेळी काही वाद झाल्यानेच कलाकार बाहेर पडतात असे नाही तर त्यांना अभिनय क्षेत्रात नवं काहीतरी करायचं असतं आणि म्हणूनच ते सुरू असलेल्या मालिकेतून निरोप घेतात . मुलगी झाली हो ही मालिका अर्थातच अनेक कारणांनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता मुलगी झाली हो या मालिकेशी जोडलेले अभिनेते अजय पुरकर यांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे . फेसबुकवर ही माहिती पोस्ट करत अजय पुरकर यांनी “पुन्हा लवकरच भेटू …हर हर महादेव” असं म्हणत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाचे आभारही मानले आहेत.

ajay purkar in serial mulgi zali ho
ajay purkar in serial mulgi zali ho

बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालणाऱ्या पावनखिंड या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत अजय पुरकर यांनी आपली एक ओळख निर्माण केली . अर्थात अजय पुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय आणि गायन क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत . पावनखिंड या सिनेमानंतर आता त्यांचा शेर शिवराज हा सिनेमा प्रदर्शनाच्या तयारीत आहे . याच सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या अजय पुरकर व्यस्त आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून अजय पुरकर हे रोज घराघरातील प्रेक्षकांच्या भेटीला येत होते . परंतु अजून बरेच काही नवीन करायचं आहे आणि त्यासाठीच या मालिकेतून निरोप घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अजय पुरकर यांनी या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अजय पुरकर यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे, की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे…पुन्हा लवकरच भेटू…नवीन प्रोजेक्ट घेऊन…तोपर्यंत हर हर महादेव..”. अजय पुरकर आता यापुढे मुलगी झाली हो या मालिकेत जरी दिसणार नसले तरी शेर शिवराज या त्यांच्या आगामी सिनेमा बरोबरच ते अजून कोणत्या नाटकात ,सिनेमात किंवा वेब सिरीज मध्ये येणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अजय पुरकर यांचे ‘कोडमंत्र’ नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या सिनेमांशी अजय पुरकर जोडलले आहेत.

actor ajay purkar
actor ajay purkar

अजय पुरकर हे उत्तम गायक असून आजपर्यंत त्यांनी गाण्याच्या अनेक रियालिटी शोमध्ये त्यांच्या गायकीची झलकही दाखवली आहे . राजा राणी ची ग जोडी या मालिकेत दादासाहेब ही भूमिका त्यांनी साकारली होती. दरम्यान सध्या मुलगी झाली हो या मालिकेची वेळ बदलून ती दुपारी प्रदर्शित करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला आहे. यावरूनही सध्या ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे . मालिकेचा टीआरपी घसरल्याने मालिकेची वेळ बदलण्यास भाग पाडलं अशा शब्दात या मालिकेतून काढून टाकलेला अभिनेता किरण माने याने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने मुलगी झाली हो ही मालिका सोशल मीडियावर चर्चेत असतानाच अजय पुरकर यांनी या मालिकेला निरोप देत असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या अचानक एक्झिट मुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडले होते . पण आज जयपूरकर यांनीच त्यामागचं कारण सांगत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. नवीन प्रोजेक्ट करून तुमच्यासमोर पुन्हा येईल असं म्हणत त्यांनी ह्या विषयाला पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *