मराठी सृष्टीतील एक दिलखुलास सेलिब्रिटी कपल म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे पाहिलं जातं. शुभ मंगल सावधान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिनाथने उर्मिलाला पाहिलं होतं आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर काही दिवसातच या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. जिजाच्या जन्मानंतर उर्मिला पुन्हा एकदा मालिका सृष्टीत सक्रिय झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उर्मिला आणि आदिनाथ या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

मीडियाच्या माध्यमातून या दोघांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला आहे. आदिनाथ कोठारे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रमुखी चित्रपटानिमित्त व्यस्त पाहायला मिळाला. त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनला उर्मिलाने कुठेच हजेरी लावलेली पाहायला मिळाली नाही. तसेच इन्स्टाग्रामवरून उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो केलं आहे अशीही चर्चा पाहायला मिळाली. उर्मिलाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून पुनरागमन केले मात्र स्वतःची निर्मिती संस्था असून देखील तिने दुसऱ्या निर्मिती संस्थेतून पुनरागमन का केले ? असा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. याशिवाय आदिनाथ आणि उर्मिला एकाच बिल्डिंगमध्ये राहत असले तरी उर्मिला वेगळ्या फ्लॅटमध्ये राहते अशीही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. याशिवाय ४ मे रोजी उर्मिलाचा वाढदिवस असतो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथ नेहमीच तिच्यासोबतचे बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत असतो मात्र ह्या वाढदिवसाच्या दिवशी आदिनाथने उर्मिलाला साध्या शुभेच्छा देखील दिलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत असेच चित्र पाहायला मिळाले.

मात्र सोशल मीडियावर ह्या सर्व गोष्टी आता अवास्तव वाढत जात असल्याचे पाहून आदिनाथने यावर मौन सोडलेलं पाहायला मिळत आहे. मीडियाशी संवाद साधत असताना आदिनाथने याबाबत म्हटले आहे की, या सगळ्या केवळ अफवा आहेत. या गोष्टींकडे मी आणि स्वतः उर्मिला कधीच लक्ष देत नाही. आमच्या आयुष्यात आम्ही खूप सुखी आहोत. सध्या मी चित्रपटाच्या प्रमोशनमुळे आणि उर्मिला मालिकेमुळे व्यस्त आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आउटडोअर शूट असल्यामुळे उर्मिलाला तिथे राहावं लागतं आहे. त्यामुळे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगवल्या जात आहेत. पण आमच्यात काहीच बिनसलेलं नाही’ असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.