बरीचशी कलाकार मंडळी आपण रिलेशनमध्ये आहोत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर हिने देखील निर्माता अनिश जोग ह्याच्या प्रेमात असल्याचे जाहीर केले होते .’दौलतराव सापडला’ असे कॅप्शन देऊन तिने प्रेमात असल्याचे म्हटले होते. सई पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने एक खास फोटो शेअर करून असेच काहीसे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. काल नक्षत्रा मेढेकर हिचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून अभिनेता अभिजित आमकर याने नक्षत्राला हटके अंदाजात शुभेच्छा दिला.

अभिजीतने Have my heart असे कॅप्शन दिल्याने त्यांच्यात मैत्रिपलीकडचे नाते आहे असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या वरून हे दोघे प्रेमात आहेत असे बोलले जात आहे. नक्षत्राच्या या फोटोवरून हे दोघे प्रेमात असल्याने तिच्या फॅन्सची मनं दुखावली आहेत. नक्षत्रा मेढेकर हिचे पूर्ण शिक्षण ठाण्यात झाले. कॉलेज मध्ये असतानाच नक्षत्राला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. इटीव्ही मराठी वरील ‘माझिया माहेरा’ या मालिकेतून तिला पल्लवीची मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतून तिला विकास पाटील सोबत स्क्रीन शेअर करता आली. लेक माझी लाडकी, सूर राहूदे, चंद्र आहे साक्षीला अशा मालिकांमधून नक्षत्राला महत्वपूर्ण भूमिका मिळत गेल्या. काही म्युजीक व्हिडिओमधून नक्षत्रा झळकली आहे. नक्षत्रा अभिजित आमकरला डेट करत असल्याचे त्यांच्या या फोटोवरूनच अंदाज समजते. तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी देखील या फोटोवरून त्यांच्यात प्रेम असल्याचा खुलासा केला आहे. अभिजित आमकर हा मराठी चित्रपट मालिका अभिनेता आहे.

हृदयी वसंत फुलताना, टकाटक, एक सांगायचंय, तुझ्यावाचून करमेना अशा प्रोजेक्टमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भ्रम चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकला. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर प्रकारात मोडणारा असून चित्रपटाची कथा २४ तासांत घडणाऱ्या घटनांच्या भोवती फिरणारी आहे. विशेष म्हणजे क्राईम थ्रिलर विषय असलेल्या या चित्रपटात अभिजित मुख्य भूमिका साकारणार आहे. नक्षत्राकडे सध्या कुठला प्रोजेक्ट नसला तरी ती अभिजित आमकरच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे या फोटोवरून लक्षात येत असल्याने तिच्या चाहत्यांची मनं नक्कीच दुखावली आहेत.