Breaking News
Home / जरा हटके / अक्षया हार्दीच्या लग्नाबरोबर आजच या मराठमोळ्या अभिनेत्याने होणार थाटात लग्न

अक्षया हार्दीच्या लग्नाबरोबर आजच या मराठमोळ्या अभिनेत्याने होणार थाटात लग्न

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. एकापाठोपाठ एक करत ह्या वर्षाच्या अखेरीस मराठी सेलिब्रिटींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाची धामधूम गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आज २ डिसेंबर २०२२ रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून अक्षया आणि हार्दीकच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची धामधूम त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली. आज या सेलिब्रिटी जोडी सोबतच आणखी एक प्रसिद्ध अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकताना पाहायला मिळणार आहे. झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं होतं. या मालिकेतील डॉ सुयश म्हणजेच अभिनेता आशय कुलकर्णी आज विवाहबंधनात अडकणार आहे.

aashay kulkarni and saniya godbole
aashay kulkarni and saniya godbole

अभिनेता आशय कुलकर्णी याने या मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती. मात्र झी मराठीच्याच पाहिले न मी तुला मालिकेतून तो नायकाच्या भूमिकेत दिसला. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमातून आशयने काम केलं आहे. त्याचा प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा भयपट १६ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विराजसने केले आहे. तर सोनाली कुलकर्णी सोबत तो प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाची उत्सुकता अशयला आहेच मात्र आता तो आयुष्याच्या एका महत्त्वाच्या निर्णयावर येऊन ठेपला आहे. आज आशय कुलकर्णी त्याची बेस्ट फ्रेंड सानिया गोडबोले हिच्यासोबत लग्न करत आहे. काल दापोली येथे लाडघर बिच जवळील एका फार्म हाऊसमध्ये आशय आणि सानिया चा संगीत सोहळा पार पडला. यावेळी या दोघांनी वेगवेगळ्या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी देखील संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या त्यांच्या लगीनघाईत मेहेंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला. आज आशय आणि सानियाच्या डोक्यावर अक्षदा पडणार आहेत त्यामुळे कुलकर्णी आणि गोडबोल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सानिया गोडबोले भरतनाट्यम विशारद आहे. ती स्वतःचे नृत्याचे क्लासेस देखील चालवते. सानिया ही अभिनेता सुव्रत जोशीची मावस बहीण आहे.

saniya godbole and aashay kulkarni wedding
saniya godbole and aashay kulkarni wedding

सुव्रत आणि सानिया या भावा बहिणीचे नाते खूप घट्ट आहे. आज आशय आणि सानियाच्या लग्नाला सुव्रत जोशी, सखी गोखले, शुभांगी गोखले, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत सोबतच काही मराठी सेलिब्रिटींना देखील त्यांनी लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. आशय आणि सानिया हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजमध्ये असतानाच या दोघांमाध्ये प्रेम जुळून आले होते. इतक्या मैत्रीच्या अतूट नात्यानंतर आज या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले याच्या सोबतच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ह्या २ मराठमोळ्या कलाकारांच्या जोडीला आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *