बिग बॉसच्या घरात आदीश वैद्यने वाईल्ड कार्ड द्वारे धमाकेदार एन्ट्री केली होती. आल्याआल्या त्याचा जय दुधानेसोबत वाद झाला होता. मला फालतू ऍटीट्युड द्यायचा नाही…तुझी बॉडी बिडी काय असलं ते दुसऱ्यांना दाखवायचं… माझ्या इतक्या जवळ यायचं नाही…बिग बॉस हा जर माझ्या इतक्या जवळ आला तर रुल्स गेले उडत…असे म्हणून बिग बॉसच्या घरात त्याने आपला दरारा वाढवला होता. दरम्यान बिग बॉसच्या घरात येण्याआधी आदिशने गुम है किसीं के प्यार में ही हिंदी मालिका सोडली होती. मराठी मालिकेत स्थान मिळवल्या नंतर तो हिंदी मालिकेत देखील चमकला होता. या मालिकेमुळे आदिशला हिंदी मालिका सृष्टीत प्रसिद्धी मिळाली होती.

बिग बॉसच्या घरात आल्यावर स्नेहा वाघ ने त्याच्यावर नाराजी दर्शवली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आदीश स्नेहा वाघशी बोलण्याचा प्रयत्न करत होता मग मात्र महेश मांजरेकर यांनी स्वतः बिग बॉसच्या चावडीवर त्याचा हा प्रयत्न सोडून देण्यास सांगितले होते. तिला जर आवडत नसेल तर तू का तिच्याशी बोलायला जातोस असे म्हणून मांजरेकरांनी आदिशची कानउघडणी केली होती. मात्र आजच्या दिवशी बिग बॉसच्या घरात टास्क खेळत असताना आदीश आणि जय दुधाने यांच्यात पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळतो आहे. टास्कदरम्यान आदीश जयवर चिडतो…” गेम म्हणून खेळताच येत नाही, फक्त फिजीकॅलिटीच…रानटी…अरे जा रे कुत्र्या जा जा जा..” आदीशने शिवी देताच जय देखील भडकलेला पाहायला मिळाला. “कुत्र्या काय म्हणतो रे…” असे म्हणत जय आदिशच्या दिशेने रागात जातो. एकीकडे आदिशने जयला कुत्रा म्हटल्याने जयच्या विरोधात असणारे तमाम प्रेक्षक मात्र भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहेत. जयची जिरवायला कोणीतरी हवं आणि आदिशच्या बाजूने ते काम होत असल्याचे पाहून आदीशचे कौतुक देखील करण्यात येत आहे.

मात्र आदिश आणि जय मध्ये झालेला हा वाद कुठल्या थराला पोहोचतो हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान दोघांमधील झालेला वाद कोणी मिटवण्यासाठी प्रयत्न करणार का हे देखील पाहावे लागणार आहे. काहीच दिवसापूर्वी आदिशने मीरा सोबत देखील वाद घातला होता. त्यामुळे आदीश बिग बॉसच्या घरात केवळ राडा घालून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का असेही प्रेक्षकांकडून बोलले जात आहे. बिग बॉसच्या घरात वाद हाच मूळ मुद्दा बनलेला आहे असेच चित्र आता पाहायला मिळत आहे. टास्कमध्ये वाद घालण्यापेक्षा तो खेळ खेळ म्हणून खेळला की त्याचा आनंद प्रेक्षकांना देखील होईलच मात्र हे वाद जर वाढतच जाणार असतील तर या शो ची मजाच निघून जाईल. त्यामुळे बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी या स्पर्धकांची कानउघडणी करावी हीच मागणी आता प्रेक्षक करताना दिसत आहेत.