
झी मराठीवरील बहुप्रतिक्षित महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा रविवारी म्हणजेच उद्या २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता वाहिनीवर प्रक्षेपित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आदेश बांदेकर यांनी महामिनिस्टरचा कार्यक्रम केला होता. या जिल्ह्यातून १२ जणींची महाअंतिम सोहळ्यात निवड करण्यात आली आहे या १२ जणींना प्रत्येकी एक लाखांची पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते मात्र आता महाअंतिम सोहळ्यात या १२ जणींमध्ये ११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी चुरस रंगलेली पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे कोणत्या वहिनींना ही ११ लाखांची पैठणी मिळणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या ११ लाखांच्या पैठणीची झलक नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाले. लाल आणि सोनेरी रंगात सजलेली ही पैठणी पाहण्याचा मोह अनेकांना झाला होता. सोने आणि हिऱ्यांच्या रुपात सजलेली ही पैठणी नेमकी कशी दिसते असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात घर करून होता त्यामुळे ११ लाखांच्या पैठणीची झलक पाहून या प्रश्नाचा उलगडा झालेला पाहायला मिळाला . मात्र अशातच ही पैठणी जिंकण्याचा मान देखील कोणी पटकावला आहे हे देखील उघड झालेले पाहायला मिळत आहे. आज शनिवारच्या महामिनिस्टरच्या भागात सुरुवातीपासून रंगलेल्या सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. या सोहळ्यामुळे अनेक जण बोलत्या झाल्या तर काहींनी आपल्या आठवणींना उजाळा देत डोळ्याच्या कडा पाणावल्या, त्यांच्या आयुष्यातले अनेक मजेशीर आठवणींचे किस्से पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. त्यामुळे आज शनिवारचा विशेष भाग आठवणींना उजाळा देत होता.

उद्याच्या होणाऱ्या अंतिम सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे मात्र हे चित्रीकरण संपूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. मात्र आता महामिनिस्टरच्या महाअंतिम सोहळ्याच्या विजेत्याचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ११ लाखांची पैठणी मिळवण्याचा मान रत्नागिरीच्या ‘सौ लक्ष्मी मंदार ढेकणे ‘ यांनी पटकावला आहे. ११ लाखांची पैठणी नेसलेला त्यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे ही ११ लाखांची पैठणी रत्नागिरी केंद्राने पटकावलेली असल्याचे उघड झाले आहे. आता या विजेत्या वहिणींचे म्हणजेच सौ लक्ष्मी ढेकणे यांचे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात या नावाच्या उलगड्यानंतरही उद्या होणाऱ्या महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना नक्कीच लागलेली असणार हे वेगळे सांगायला नको.