Breaking News
Home / जरा हटके / खरं खरं सांगतो म्हणत शशांकने सांगितल प्रियंकाने लग्नाला होकार देताना हि गोष्ट माझ्याकडून कबूल करून घेतली होती

खरं खरं सांगतो म्हणत शशांकने सांगितल प्रियंकाने लग्नाला होकार देताना हि गोष्ट माझ्याकडून कबूल करून घेतली होती

एक काळ होता की कलाकार हे त्यांच्या भूमिकेतून, त्यांनी साकारलेल्या पात्रातून चाहत्यांच्या लक्षात रहायचे. कलाकारांविषयी छापून येणार्‍या बातम्या, त्यांच्या मुलाखती वाचण्यासाठी प्रेक्षक आतूर असायचे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी तेच एक माध्यम होतं. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आवडत्या गोष्टी बघायच्या तर कधी त्यांची मुलाखत वाचायला मिळेल, टीव्हीवर पहायला मिळेल याकडे चाहत्यांचे डोळे लागून रहायचे. पण आता सोशलमीडियाने हे काम अगदीच सोप्पं केलंय. कलाकारही अगदी त्यांच्या पर्सनल गोष्टी सोशलमीडियावर शेअर करतात. शिवाय सोशलमीडियावरील ट्रेंडसही फॉलो करतात. सेलिब्रिटींच्या रिल्स, स्टोरी यांच्यावर लाइक आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. सध्या सुरू असलेल्या खरं खरं सांग या चॅलेंजमध्ये टीव्हीस्टार शशांक केतकर याने जी गोष्ट खरीखरी सांगितली आहे त्याच गोष्टीमुळे त्याचे लग्नही जुळलं आहे.

actor shashank ketkar wife priyanka
actor shashank ketkar wife priyanka

खरं खरं सांग हा ट्रेंड सध्या इन्स्टावर आहे. या चॅलेंजमध्ये शशांकने त्याची खरी गोष्ट सांगितली. सोबतच शशांकने त्याचे आणि बायको प्रियांका यांच्यातील एक सिक्रेटही ओपन केले. अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिने शशांकला खरं खरं सांग हे चॅलेंज दिले. हाच किस्सा शशांकने त्याच्या इन्स्टापेजवर व्हिडिओसह शेअर केला आहे. खरं खरं सांगणे इतकं कठीण असतं का अशी कॅप्शनही शशांकने दिली आहे. खरं खरं सांगतो असं म्हणतच शशांकने या व्हिडिओची सुरूवात केली आहे. तर शशांकच्या आयुष्यातील खरी गोष्ट ही आहे की शशांकला जेवण बनवायला खूप आवडतं. शूटिंगच्या सेटवर तो घरातून डबा आणतो तो डबाही त्याने स्वत: बनवलेला असतो. शशांक या चॅलेंजट्रेंडमध्ये असं म्हणतो की जेवण बनवण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. शूटिंग नसतं किंवा एक मालिका संपून दुसरे काम हातात नाही तेव्हा मला रिकामा वेळ असतो तेव्हाही मी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचाच उदय़ोग करत असतो. या पाककलेतून शशांकने आईच्या गावात हे हॉटेल सुरू केले. शिवाय त्याने त्याचे यूटय़ूब चॅनेल सुरू केले त्यातही तो वेगवेगळे पदार्थ बनवतानाच दिसला आहे. थोडक्यात काय, शशांक जेव्हा सेटवर काही पदार्थ डब्यातून आणतो तेव्हा तो सांगतो की ते पदार्थ त्यानेच बनवले आहेत , तेव्हा अनेकांना ते खोटं वाटतं पण खरंच शशांक त्याचा डबा बनवून आणतो. यापुढे जाऊन या व्हिडिओमध्ये शशांकने अजून एक अंदरकी बात सांगितली आहे.

actor shashank ketkar wedding
actor shashank ketkar wedding

शशांकने जेव्हा त्याच्या बायकोला प्रियांकाला त्याच्या पाककलेबददल सांगितले तेव्हा, ती म्हणाली होती की, मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा तू स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन. आणि शशांकनेही लगेच होकार दिला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रियांकाला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा ती दमून येते तेव्हा स्वयंपाकघराचा ताबा शशांकच घेतो. खरं सांगता सांगता शशांकने सांगितलेले हे सिक्रेटही त्याच्या चाहत्यांना खूप आवडले. होणार सून मी या घरची यामालिकेतील श्री या भूमिकेने शशांक घराघरात पोहोचला. त्याने मोठय़ा पडदयावरही भूमिका केल्या पण टीव्ही मालिकेची नस त्याला अचूक सापडली. इथेच टाका तंबू, मन बावरे, पाहिले न मी तुला या त्याच्या मालिका आणि त्यातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. सध्या शशांक मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. व्यक्तीगत आयुष्यात पाककौशल्यासोबतच तो एक पटटीचा जलतरणपटू आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *