प्रसाद ओक अभिनित धर्मवीर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक मराठी माणूस आणि शिवसैनिकांनी तिकीट बारीवर एकच गर्दी केली. अशात या चित्रपटाच्या संबंधित एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. रोज या चित्रपटासाठी असलेली गर्दी आज अचानक गायब झाली. आणि चित्रपट गृहात फक्त एकच व्यक्ती चित्रपट पाहत होता. प्रसादने फक्त एकच प्रेक्षक चित्रपट पाहत असल्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये फक्त व्यक्ती चित्रपट गृहात चित्रपट पाहताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अभिनेता आणि डायरेक्टर प्रसाद ओक याने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “धर्मवीर” चा शो पाहायला सिनेमागृहात “फक्त एकच माणूस”????? मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं…!!! याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल…!!!” आता कारण नेमकं काय? या व्हिडिओमध्ये धर्मराज बोलताना दिसत आहेत की, “प्रसाद ओक यांचे मी अनेक चित्रपट आजवर पाहिले आहे. त्यांची अभिनयाची शैली ही खूपच सुंदर आहे. अशात मी हे संपूर्ण थेटर एकत्यासाठी बुक केलं आहे. कारण चित्रपट पाहताना मला शांतता हवी होती. सगळे असेल की, अनेक जण मागे बसून वा खूप छान वेगेरे अशा कॉमेंट्स करतात. मला एकट्याने हा चित्रपट पाहायचा होता आणि समजून घ्यायचा होता. त्यामुळेच मी संपूर्ण चित्रपटगृह एकट्यासाठी बुक केलं.” आपल्या चाहत्याच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत प्रसाद ओकने लिहिले आहे की, “आचार्य श्री धर्मराज गुरुजी… तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये गुरुजी… असंच प्रेम…असाच आशीर्वाद कायम असुद्या हीच नम्र विनंती.”

धर्मवीर चित्रपटात दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. आणि आनंद दिघे यांची व्यक्ती रेखा प्रसाद ओकने हुबेहूब साकारली आहे. म्हणूनच आज हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला आहे. मुंबईतील लोकांच्या मनात साठवून राहिलेले प्रसंग आणि आठवणी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवायला मिळाल्या. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी प्रसादाचं कौतुक करत त्याने केलेल्या कामाबद्दल आणि हुबेहूब आनंद दिघे साहेबांसारखं दिसण्यावरून आश्चर्य व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरोखरच ह्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रसाद ओक अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.