स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले आहे. अबोली आणि अंकुशला वेगळे करण्यासाठी विजया खूप प्रयत्न करते. अंकुशची स्मृती जाण्यासाठी ती त्याला गोळ्यांचा डोस सुरू करते. अर्थात या गोळ्यांमुळे अंकुशचा सचित बनतो आणि त्याला पुन्हा मिळवण्यासाठी अबोली जीवाचे रान करताना दिसते. अंकुशची स्मृती आता परत आली असल्याने विजयाचा डाव हाणून पाडण्यासाठी अबोलीसोबत तो एल बनाव रचतो. पण यात बहुरूपी त्यांच्यात पुन्हा आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असतो. हा बहुरूपी आतापर्यंत १२ वेगवेगळ्या वेशात येऊन अंकुशला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. ही भूमिका अभिनेता सुयश टिळक याने साकारलेली असते. सुयश टिळक या मालिकेत स्त्री पात्र देखील साकारताना पाहायला मिळाला आहे.
पण अखेरीस त्याचा डाव अंकुश आणि अबोली उधळून लावतात आणि या बहुरुप्याला जेरबंद करतात. आजच्या भागात बहुरूप्याला पोलिसांनी अटक केलेली दाखवली आहे. अबोली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर सुयश टिळकने साकारलेल्या तब्बल १२ भूमिकांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे. पहिल्यांदाच सुयश या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारताना दिसला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून असे प्रयोग याअगोदर करण्यात आले होते. पण मराठी मालिका सृष्टीत एकाच अभिनेत्याने १२ भूमिका साकारणे हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावे. सुयशला या भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने तो या मालिकेबाबत खूपच उत्सुक होता. स्त्री पात्र, वयोवृद्ध पात्र साकारताना त्याला तेवढीच मजा आली असे तो या भूमिकांबाबत सांगतो. सुयश गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. एकाचवेळी आणि एकाच मालिकेत इतक्या भूमिका साकारणे हे तेवढंच कठीण काम होतं.
शेवटच्या बहुरूपीसाठी तो मेकअप आर्टिस्टला ह्याचे क्रेडिट देतो. सुयशचा हा गेटअप पाहून सेलिब्रिटींनी देखील त्याच्या या कामाचं विशेष कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. अबोली या मालिकेतून नकारात्मक भूमिका साकारण्याअगोदर सुयश हा सोनी मराठीवरील जीवाची होतीया काहिली मालिकेत नकारात्मक भूमिकेतच पाहायला मिळाला होता. खरं तर अशा भूमिका स्वीकारताना सुयशने यावर खूप विचार केला होता. लॉकडाऊनच्या काळापासून तो बराचवेळ मालिकेतून गायब झालेला दिसला. यादरम्यान त्याने फिरण्याचा छंद जोपासला होता. खरं तर अक्षया देवधर सोबत ब्रेकअप झाल्यामुळेच सुयश डिप्रेशन मध्ये गेला होता. ह्याच कारणामुळे नाटकाचे काही दौरे वगळता तो फारसा मालिकेतूनही दिसत नव्हता.