सध्या सोशल मीडियामुळे केवळ सेलिब्रिटी कलाकारांच्याच आयुष्यातील किस्से किंवा खास क्षण हे त्यांच्या चाहत्यांना पर्यंत पोहोचत नाही तर हे कलाकार आपल्या कुटुंबातील अनेक गोष्टी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. अभिनेता सचित पाटील याने त्याची पत्नी शिल्पा पै हिच्या सोबत चे फोटो शेअर करत ती एक उत्तम गायिका असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. सचिनची पत्नी शिल्पाने आजवर अनेक मराठी गाणी तर गायिली आहेतच पण त्याच बरोबर भोजपुरी भाषेतूनही शिल्पाने गायलेली गाणी प्रसिद्ध झाली आहेत. इतकच नव्हे तर सचित ची भूमिका असलेल्या क्षणभर विश्रांती या सिनेमातही शिल्पाने गाणं गायले आहे. पत्नी शिल्पाच्या गायनाचं कौतुक करत सचिनने तिच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यावरूनच सचिनच्या चाहत्यांकडून त्याची पत्नी शिल्पाचेही कौतुक करणाऱ्या कमेंट आल्या आहेत. अभिनेता सचित पाटील सध्या अबोली मालिकेत इनस्पेक्टर अंकुश शिंदेची भूमिका साकारताना दिसत आहे. अनेक सिनेमे केल्यानंतर त्याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला आहे. सध्या त्याच्या मालिकेतील अभिनयाचे कौतुक होत आहे. मालिकेत त्याचे अबोलीसोबत लग्न झालं आहे. या दोघांची केमिस्ट्री देखील लोकांना आवडते. क्यों या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सब कुछ है कुछ भी नही, रास्ता रोको यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. त्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने दिग्दर्शित केलेल्या साडे माडे तीन या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली. त्यानंतर त्याने अवधुत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने काम करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

त्याची राधा प्रेम रंग रंगली ही मालिका काही महिन्यांपूर्वी चांगलीच गाजली होती. क्षेत्रात करिअर करत असलेले कपल्स आणि त्यांची केमिस्ट्री आपण नेहमीच पाहतो . परंतु वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपापलं स्थान कमावलेले जोडीदार जेव्हा एकमेकांचे कौतुक करतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याला सलाम करावासा वाटतो .सचित पाटील आणि शिल्पा पै हे दोघे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कामाचा आदर करताना दिसतात . सचित पाटील हा उत्तम अभिनेता म्हणून तर लोकप्रिय आहे पण त्याला फोटोग्राफीची देखील छंद आहे. शुटिंगच्या निमित्ताने भटकंती करत असतो तेव्हा त्याच्या सोबत नेहमीच त्याचा कॅमेरा असतो .शिल्पा एक उत्तम गायिका आहेच पण ती मला साथ देणारी माझी मैत्रीणही आहे. तिला गायनाचा सूर सापडला आहे तसाच आमच्या नात्याचा सूरही तिने खूप छान जपला आहे असं सचित शिल्पा विषयी बोलताना म्हणतो.