
हिंदी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अभिजित बिचुकले यांनी सलमान खानच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली होती. अभिजित बिचुकले आणि सलमान यांच्यात बिग बॉसच्या घरात असल्यापासूनच वाद सुरू झाले होते मात्र तेव्हा मी पिंजऱ्यात होतो आणि आता मी पिंजऱ्यातुन बाहेर पडलो आहे असे म्हणत १०० सलमान माझ्या गल्ल्या झाडायला ठेवीन असे बिचुकले त्याच्या विरोधात म्हणाले होते. शिवाय बिग बॉसचा फिनाले दोन दिवसात आहे आणि मी त्यानंतर मीडियासमोर मी सगळा खुलासा करणार आहे असे ते म्हणाले होते.

मात्र बिग बॉसचा फिनाले होण्याअगोदरच बिचुकले यांनी मिडियासमोर एक मुलखात दिली आहे. त्यात त्यांनी सलमानला खुलं आव्हानच दिलेलं पाहायला मिळत आहे. माझा चित्रपट येतोय आणि तो तू रोखून दाखव असे खुले आव्हान देत बिचुकले सलमानच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांना म्हणजेच तुझ्या कुत्र्यांना आवर असे म्हणत आहे. बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं आणि बाहेर काय दाखवलं यात बराच फरक असल्याचे सांगितले आहे. अडीच महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा बिचुकले घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी त्यांच्याबाबत घडलेल्या गोष्टी पुन्हा पाहिल्या मात्र मी जे काही बोललो ते बिग बॉसने एडिट करून दाखवल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. सलमानच्या बाजूने आता अनेक महिला आणि पुरुष बोलायला पुढे येत आहेत त्या कुत्र्यांना तू आवर घाल , आपल्यात जे वाद सुरू झाले त्याची सुरुवात तू केलेली आहेस, मी नेहमी माझ्या स्टाईलमध्ये जगतो, आम्ही संयमी माणसं आहोत शोमध्ये जे करायचं ते मी केलं पण…

आता तुझ्या माणसांना आवर तुला खान नावाचं घमेंड असेल तर तू अफजलखान होशील मी शिवरायांच्या सातारच्या गादीच्या वैचारिक वारस आहे, तुझा कोथळा काढेन… बिग बॉसचा फिनाले रंगणार आहे मात्र यावेळी बिचुकलेना आयोजकांनी आमंत्रण देण्याचे टाळले आहे. बिग बॉसच्या घरातून जे स्पर्धक बाद झाले होते त्या सर्वांना फिनालेमध्ये बोलवलं मात्र मला सद्य परिस्थितीचे कारण सांगून आमंत्रण देण्याचे टाळले आहे मी बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे हा शो टीआरपी मध्ये पुढे आला होता माझ्यामुळे हा शो चांगला गाजला त्यामुळे सलमान खान माझ्यावरती जळायला लागला . मला एन्डोमोल कंपनीला विचारायचंय की सलमान तुमच्याकडे नोकर म्हणून काम करतो की एन्डोमोल कंपनी सलमानची आहे?…