आशा भोसले, लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिकांनी करोडो प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे. आशा भोसले यांच्या संगीताचा वारसा त्यांची नात पुढे चालवताना दिसत आहे. आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आनंद भोसले यांची लेक जनाई भोसले तिच्या निरागस सौंदर्याने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. शास्त्रीय सांगीताचे धडे गिरवलेल्या जनाईला स्वतः आशा भोसले यांनी ‘तू लता मंगेशकर हो’ असा भरभरून आशीर्वाद दिलेला पाहायला मिळतो. लता दीदींनी आपल्या सुरेल आवाजाने जशी गाणी गायली आहेत तशीच गाणी आपल्या नातीने गावीत अशी त्यांची मनापासून ईच्छा आहे.

आजच्या काही मुन्नी बदनाम हुई, हलकट जवानी सारखी संगीताची गाणी तिने गाऊ नयेत असे त्या तिला आवर्जून सांगताना दिसतात. जनाई भोसले हिने कथ्थक नृत्यात विशारद मिळवली आहे. गेल्या काही वर्षांत तिने आशा ताईंबरोबर अनेक कार्यक्रमात गाणी गायली आहेत. या आज्जी आणि नातीची जोडी अनेकदा एकत्रित गाताना पाहायला मिळाली. जनाईचा आवाज गोड आहे ती सुरेल गाते याची कल्पना त्यांना आली तेव्हा त्यांनी तिला शास्त्रीय गायनासाठी प्रोत्साहन दिले. यशराज फिम्सकडून जनाईला पहिल्यांदा एका अल्बमसाठी गाण्याची संधी मिळाली. १४ व्या वर्षी जनाईने सिक्स पॅक बँडसाठी ‘हिल हिल पोरी हिला…’ हे गाणं गायलं. हे गाणं हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेचं मिश्रण होतं. तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन या बँडची स्थापना केली आहे. आशा भोसले यांच्या नातीने आमच्या बँडसाठी गाणे गायले म्हणून तिने या बँडला एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे यामुळे आमच्या बँडला चक्क अमेरिकेहून विचारणा झाली होती अशी या बँडच्या सदस्यांनी प्रतिक्रिया दिली होती. तृतीय पंथीयांनी सुरू केलेल्या या बँडला मोठ मोठ्या कलाकारांनी साथ दिली.

त्यात जनाईने हे गाणं गाऊन खारीचा वाटा उचलत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आशा भोसले यांची नात म्हणून जनाई मीडिया माध्यमातून नेहमीच स्पॉट होते. तिच्या ग्लॅमरस लुकची आणि सौंदर्याची चर्चा देखील झालेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील जनाई चांगलीच ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. आशा भोसले आणि लता आज्जी या दोघींचाही सहवास मला लाभला आहे. दोघींचीही गाणी मला खूप आवडतात असे जनाई म्हणते. आशा भोसले यांचं गायन क्षेत्रात खूप मोठं नाव आहे त्यांच्या पावलावर जनाईने पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत बरीच गाणी देखील गायिली पण आशा भोसले यांची नात देखील गाणं गाते हे क्वचितच काही लोकांना माहित असेल. असो जनाईला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..