प्रसिद्धी आणि पैसा कमवायला वय आणि शिक्षणाची अट मुळीच नसते. मुळात तुम्हाला काय येतं आणि ते तुम्ही लोकांपर्यंत कस पोहचवता ह्याला खूप महत्व आहे. आज आपण अश्या एका आजी बद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी कधी शाळेची पायरी देखील चढली नाही. पण मेहनत आणि चिकाटीने आज त्यांनी खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळवलाय. आपली आजी म्हणून खाद्य पदार्थ बनवून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या आजीबाईंबद्दल आज आपण ह्या लेखामार्फत जाणून घेणार आहोत…

आपली आजी म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या महिलेचं नाव “सुमन गोरक्षनाथ धामणे” असं आहे. त्यांचं वय ६५ वर्ष असून त्या अहमदनगर मधील कासारसारोळा ह्या गावच्या. नगर मधील सुपं हे त्यांचं माहेर. सुमन आजींना ४ भाऊ आणि ६ बहिणी. घरात मोठ्या बहिणी आणि ४ वाहिनी ह्यांच्याकडून लहापानापासूनच त्यांना जेवण बनवायची आवड निर्माण झाली. सुमन आजीनी कधी शाळेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. पुढे सुमन बाईंचं लग्न झालं त्यांचे पती पोलीस आहेत. पती पोलीस असल्यामुळे घरात त्यांना खूप वेळ मिळायचा त्या वेळेचा सदुपयोग करत सुमनताई आणि त्यांच्या आजूबाजूच्या महिला घरात नवनवीन खाद्यपदार्थ बनवायच्या. एकदा त्यांचा नातू यश पाठक त्यांच्या घरी आला असताना त्याने सुमन आजींना पावभाजी बनवायला सांगितली. पण मला पावभाजी बनावता येत नाही असं त्या म्हणाल्या. त्यावर यशने आजींना पावभाजीची रेसिपी मोबाईलमध्ये दाखवून तशी बनवायला सांगितली. आजीबाईंनी ती बनवली देखील आणि बनलेल्या पावभाजीच सर्वानी कौतुक केले. यश च्या सांगण्यावरून आजीनी युट्युबसाठी रेसिपी बनवायला सुरवात केली. सुमन आजींना बरेच पदार्थ बनवता येत नव्हते पण त्या खूप जिद्दीच्या आहेत आपल्याला पदार्थ बनवता येत नाही म्हणून त्यांनी हार न मानता तो पदार्थ शिकण्यास सुरवात केली. सुरवातीला त्या मोबाईलवर रेसिपीचे व्हिडिओ पाहत आणि नंतर तो पदार्थ बनवून दाखवायला लागल्या. पाहता पाहता अनेक लोकांनी आजीबाईच्या रेसिपीला पसंती दाखवली. त्यांच्या बोलण्याच्या बोलण्याची स्टाईल लोकांच्या मनात घर करून गेली.

सुरवातीला त्यांच्या युट्युब चायनलने चांगलच यश मिळवलं होत पण त्यात देखील खूप मोठा अडथळा आला. त्यांनी बनवलेला च्यायनल हैक झाला. त्यामुळे आजी घाबरून गेल्या पण नातू यशाने अथक प्रयत्न करून तो पुन्हा मिळवला. आणि पुन्हा आजीबाई जोमात कमला लागल्या. वर्षभरातच आजीबाईंनी खूपच प्रसिद्धी मिळवली आज आजीबाईंच्या १० लाखांवरून जास्त चाहते आहेत जे त्यांची रेसिपी पाहून त्यांना प्रेरणा देतात. अनेक लोक त्यांना तुम्ही कोणते मसाले वापरता असे विचारतात त्यावरून त्यांनी स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरु केला. वर्षभरात त्यांनी तब्बल ३० ते ४० लाखांच्या मसाल्यांचा व्यवसाय देखील केला आहे. आज त्यांनी बनवलेले हे मसाले भारता बाहेर अनेक देशात जातात. सुमन आजीनी दाखवून दिल कि खरंच पैसा आणि प्रसिद्धी मिळवायला शिक्षण आणि वय लागत नाही तर तुम्ही तो व्यवसाय किती मेहनतीने आणि इमानदारीने करता. सुमन गोरक्षनाथ धामणे म्हणजेच आपली आजी ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..