नवरा अनिरूध्दचा एकेक शब्द झेलला त्याने लग्नानंतर २५ व्या वर्षी संजनाशी लग्नगाठ बांधली. कुटुंबानेही संजनाला स्वीकारलं. असं नातं धरून ठेवण्यापेक्षा अरूंधतीने घटस्फोट घेतला आणि आपली वेगळी वाट निवडली. आई कुठे काय करते या मालिकेच्या या कथेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरूवातीला निर्णय घेताना दबणारी अरूंधती तिच्यावर आलेल्या अनेक संकंटांनी कणखर बनली हे तिच्या चाहत्याना खूपच आवडले. तिने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला जरी तिच्या कुटुंबियांनी साथ दिली नसली तरी या मालिकेच्या प्रेक्षकांनी अरूंधतीच्या निर्णयाचे स्वागतच केले.

आता रंजक वळणावर आलेल्या या मालिकेत अरूंधती कुटुंबाला, समाजाला न जुमानता एक निर्णय घेणार आहे. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. आई कुठे काय करते या मालिकेला मिळालेल्या यशाची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे याच मालिकेवरून अनुपमा ही हिंदी मालिका सुरू झाली. अरूंधतीचे हिंदी वर्जन असलेल्या अनुपमालाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. अनुपमा आणि आई कुठे काय करते या मालिकेची कथा समांतर आहे. सध्या अनुपमा या मालिकेत अनुपमाने तिचा मित्र अनुज याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा ट्रॅक आहे. घटस्फोटानंतरच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आधार देणाऱ्या अनुजला जोडीदार म्हणून् अनुपमाने निवडलं. लवकरच या मालिकेत अनुपमा आणि अनुज यांचं लग्न होणार आहे. अनुपमातील हाच ट्रॅक अरूंधतीच्याअनुजही आयुष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही भागात आई कुठे काय करते या मालिकेत अनेक ट्वीस्ट येतील ज्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक वाढेल.

नुकत्याच झालेल्या भागात आशुतोष आणि अरूंधतीला एकत्र फिरताना बघून चिडलेल्या अभिषेकने भर रस्त्यात दंगा घातल्याचे दिसले. अरूंधती आणि आशुतोषच्या मैत्रीच्या नात्याला विरोध असलेल्या अभिकडून त्यांचे लग्न स्वीकारले जाईल का असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. तर अभिषेकने अनघासोबत वेगळं राहण्याचाही निर्णय घेतला आहे. अरूंधतीने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम तिने स्वीकारले आहेत. त्यामुळे आशुतोषकडून लग्नाचा प्रस्ताव आला तर अरूंधती जो निर्णय घेईल तो काय असेल हे अजून कळलेले नाही. पण ज्या आई कुठे काय करते या मालिकेचे हिंदी वर्जन अनुपमा या मालिकेत अनुपमाच्या लग्नाचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे तोच ट्रॅक अरूंधतीच्या आयुष्यात आला तर काय होईल याचा विचार प्रेक्षकांनी सुरू केला आहे.